*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य गझलकार जयराम धोंगडे यांच्या काव्यसंग्रहाचे लेखक श्री.उदय बरडे यांनी केलेले रसग्रहण*
*”तिपेडी” अभिजात सौंदर्याची काव्यमय त्रिवेणी गुंफण …*
*✍️उदय बरडे, नांदेड.*
श्री जयराम धोंगडे यांच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन माझ्या उपस्थितीत पार पडले होते. त्यानंतर मी सहा महिने कॅनडाला गेलो होतो. कोणत्याही नविन कवीसाठी पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यावर सहा महिने हा कौतुकाचा काळ असतो. पण जयराम हा माझा भाचा या कौतुकात अडकून न पडता दुप्पट वेगाने लिहिता झाला. एका वर्षात प्रकाशित होणारा ‘तिपेडी’ हा त्याचा चवथा काव्यसंग्रह! याआधीच्या ‘शब्दाटकी’, ‘जय बोले’ व ‘कोरोनायण’ या त्याच्या काव्यसंग्रहांना रसिकाचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. मी कॅनडातून आल्यापासून माझी त्याची भेट नव्हती. त्याच्या स्नेहपूर्वक अगत्याने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी व माझे सासरे त्याला भेटण्यासाठी व त्याचे अभिनंदन करण्यासाठी विश्व इन्स्टिटयूटमध्ये जावून आलो. एक प्रशासक म्हणून ही त्याच्या कामाचा ठसा तिथल्या वातावरणात जाणवत होता.
‘तिपेडी’ हा अतिशय सुंदर कवितांचा संग्रह असून यामध्ये प्रामुख्याने गझल हा काव्यप्रकार हाताळला असला तरी अभंग, कविता व गझल असा हा त्रिवेणी संगम आहे. मराठी सारस्वतात अनेक कवीनी आपले अमूल्य योगदान देवून मराठी काव्यविश्व् समृद्ध केले आहे. त्यामध्ये अजून एका संवेदनशील कवीची निश्चितच भर पडली आहे हे मी ‘तिपेडी’ च्या निमित्ताने इथे आवर्जून नमूद करतो.
श्री जयरामचा जीवनाशी करावा लागलेला संघर्ष व त्याच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्याला त्याच्या हॉस्पिटलमध्ये भेटलेली हजारो माणसे यामुळे त्यांचे अनुभव विश्व समृद्ध झाले आहे. या त्याच्या जीवन प्रवासात जे अनुभव त्याला आले व ज्या नोंदी त्याच्या संवेदनशील मनाने घेतल्या त्यातूनच त्यांची कविता फुलत गेली आहे. या नोंदीना शब्दरूप देतांना तो कधी भावूक होतो तर कधी अत्यन्तिक हळवा ही होतो. कोरोना ‘काळ’ होवून अवतरला आणि अनेक जणांचे संसार उध्वस्त करून गेला. हे जवळून त्याने अनुभवले. अनेकांनी यावर कविता लिहिल्या जयरामने यावर कविता लिहिली नसती तरच नवल! कोरोनाचे तांडव पाहून जयरामने ‘कोरोनायण’ हा अख्खा कविता संग्रह प्रसिद्ध केला. परिस्थितीमुळे आलेली हतबलता असह्य असली तरी प्रत्येकाने ‘माणूसकी’ जपली पाहिजे, उन्मत्तपणा बरा नव्हे कारण दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला आज ना उद्या येणारच आहे असे त्याला वाटते. माणूसकी’ या कवितेत तो म्हणतो….
“या जन्मीचे दुःख भोगणे मला वाटते सरले नाही
अन दुःखाला सोसल्याविना इथे कुणी उरले नाही!!”
जयरामची नाळ इथल्या मातीशी घट्ट जोडली गेलेली असल्यामुळे त्याला इथल्या माती व माणसा विषयी अपार प्रेम व आपुलकी आहे. जयरामचे मन निसर्गात रमते. निसर्गाचा दरवळ, त्या वातावरणातील गोडवा त्याला नेहमीच साद घालतो. म्हणून या काव्य संग्रहात इथला माणूस व त्याचे वागणे… भक्ती व निसर्ग विषयाच्या अनेक कविता आहेत. ज्यामधे “माणूस”, “खेळ”, “बेत”, “परंपरा”, “कोजागिरी”, “पांडुरंगा”, “दुट्टपी”, “चेहरा”, “पेरणी”, “सातबारा”, “श्रावण”, “पहिला पाऊस” इत्यादी कविताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
कवी जयरामला माणसाने माणूस म्हणून जगावे, या मातीवर प्रेम करत बंधुभाव जपावा असे वाटते. समाजातील जातीवाद, धार्मिक तेढ, विषमता याविषयी त्याच्या मनात प्रचंड राग व चीड आहे. इथला शेतकरी किती अगतिक आहे याची त्याला कल्पना आहे. त्यांच जीवन पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे याची त्याला जाणीव आहे म्हणून पावसाची पहिली सर येताच धरती नवरी सारखी सजून बसते व मृगोत्सव सुरु झाला असे कवीला वाटते. “पाऊस” या अभंगात कवी म्हणतो…
सजले वावर ! झाले काळेशार !
झेलावया धार ! हळुवार !!
नवेली नवरी ! होतसे बावरी !!
तैसी सृष्टी सारी ! आसूसली !!
मराठी सारस्वतात प्रत्येक कवी आईवर व सहचारिणी, सखीवर कविता करतोच करतो. कवी जयरामही त्याला अपवाद नाही. जयराम त्याच्या सहचारिणी विषयी लिहिताना “सखी” या गझलेत तो असाच हळवा होतो. ही गझल मला फार आवडली. “सखी” या गझलमध्ये तो सखीविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम व्यक्त करतो. तिच्या शिवाय हे जीवन व्यर्थ आहे. ती नसती तर आपण हे सर्व करु शकलो नसतो याची त्याला जाणिव आहे. तो म्हणतो….
“नको ना अबोला सखे त्रास होतो..
तुझे मौन आता जिवा फास होतो!
तुझी साथ माझी खरी संपदा ती…
तुझ्या लाघवाचा सखे दास होतो!!”
आई-वडिलांचा जयराम अतिशय लाडका मुलगा! वडील लवकर गेले. वडिलांविषयी लिहिताना तो खूप भावूक होतो. आई वडिलांचे ऋण फेडणे अवघड असते. प्रत्यक्षात देव आहे की नाही या भानगडीत न पडता आई वडिलांच्या रूपातच तो देव पहातो..! “जन्मदाता” या गझलमध्ये तो म्हणतो…
“देव आहे देव नाही दोन धारा…
मंदिराला भाव येतो भक्त जाता !
लेकराचे नांव व्हावे जगभरी अन
त्याचसाठी राबतो बघ जन्मदाता…!!”
श्री जयराम धोंगडे याच्या लेखणीतून अनेक विषयांना स्पर्श झाला आहे. “आराधना”, “दुःख”, “भरारी”, “नियम”, “चिंतन”, “विठू माऊली”, “ऋतू” या कविता नितांत सुंदर झाल्या आहेत. त्याची धर्मपत्नी सौ. बबिता हीचे त्याच्या लिहिण्यात मोठे योगदान व सहकार्य आहे. त्या विषयी ही तो कृतज्ञ आहे.
“तिपेडी” या सुंदर काव्यसंग्रहात एकूण 90 काव्यरचना आहेत. जवळपास 100 पानांचे हे पुस्तक अष्टगंध प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केले असून त्याची किंमत ₹ 200/- इतकी आहे. पुस्तकाला साजेसे मुखपृष्ठ श्री संतोष घोंगडे यांनी काढले आहे.
श्री जयराम धोंगडे यांच्या “तिपेडी” काव्यसंग्रहाचे मी मनापासून स्वागत करतो. त्याच्या साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक आशीर्वाद व माझ्या लाख लाख शुभेच्छा!!.
उदय बरडे
चक्रधरस्वामी नगर,
नांदेड.
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________