You are currently viewing अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला साडेपाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त…

अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला साडेपाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त…

दिवाळीपुर्वी नुकसान भरपाईचे वाटप सुरु होणार

  – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

अतीवृष्टी मुळे जिल्ह्यात 23हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई साठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आसल्याचे पालकमंत्री उदय सामंत आज म्हणले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाच्या उद्घाटन आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री सामंत बोलत होते.

  यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार आमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालनकर,

सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण,

जि.प. सदस्य नगेन्द्र परब, संग्राम प्रभुगावकर,संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 झाराप येथे वैद्यकिय महाविद्यालयासाठी शिक्षण विभगाची जागा देण्यास 48 तासात मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणले की, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे या साठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत या साठी जनता दरबार सुरु करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुका स्तरावर्ही घेण्यात येणार आहेत. तळ्गाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या तलाठी सजाचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे.  दर सोमवारी आणि गुरुवारी तलाठी या कार्यालयात थबुन लोकांची कामे करतील. तलाठी यानी लोकांचा विश्वास संपादन करुन चांगले काम करावे असेही पालकमंत्री श्री सामंत म्हणाले.

 खासदार आणि आमदार यांचे कौतुक

आदर्श खासदार कसे आसवेत हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात यावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाल की, या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै,मधू दंडवते यांचा वरसा लाभला आहे. याचे जतन खासदार विनायक राऊत करत आहेत. आमदार वैभव नाईक यांचे काम ही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदार संघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत, या मतदार संघात सर्वात जास्त निधी आणण्याचे कां ही आमदार श्री नाईक यानी केले आहे.

 सुरवातीस तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी उपस्थीत मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचीही भाषणे झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 7 =