*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*हा खेळ सावल्यांचा..*🌓🌒🌔🌘🌗🌖🌕🌙
ग्रहण म्हणजे ऊनसाववल्यांचा खेळ. संपूर्णपणे या खगोलीय घटना आहेत. आणि यावर मानवी शक्तीचा, बुद्धीचा कुठलाही अवरोध अथवा संबंध नाही.
मात्र ग्रहणाभोवती असलेल्या अनेक कल्पक, पौराणिक कथांमुळे या खगोलीय घटनांविषयी मानवी आयुष्यात अनेक समज —गैरसमज, श्रद्धा— अंधश्रद्धा फोफावलेल्या आहेत आणि या देशोदेशी आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत, विकसित देशातही अस्वलाने सूर्यचंद्राला गिळले म्हणून ग्रहण लागते अशी समजूत आहे. चीनमध्ये याच सूर्यचंद्रांना ड्रॅगननी गिळलेले असते, भारतात सूर्य चंद्र गिळण्याचे काम राहू हा ग्रह करतो. काही देशात हे काम कुत्र्यांचे, कासवांचे असते. थोडक्यात काय ग्रहण म्हणजे एक अशुभ घटना मानली जाते. आणि अशुभ म्हटले की आपोआपच सावधानतेचे इशारे नोंदले जातात.
यापैकी ग्रहणातले इशारे म्हणजे ग्रहण काळात भात शिजवू नये, ग्रहणाचे वेध लागण्याच्या आधीच जेवण उरकवून घ्यावे, गर्भवती महिलांनी ग्रहण काळात बाहेर पडू नये, ग्रहणात गर्भवती महिलांनी काही चिरू नये नाहीतर होणाऱ्या बाळाचे अवयव फटके असण्याची शक्यता असते, ग्रहण काळात झोपू नये, सेक्स करू नये, ग्रहणकाळात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते म्हणून तो काळ अशुभ असतो..वगैरे वगैरे. अशा अनेक समजूती या ग्रहणासंबंधी समाजात पसरलेल्या आहेत. पण याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे या सगळ्या समजूती खोट्या आहेत.
‘केवळ विषाची परीक्षा कशाला घ्यावी?’ , म्हणून त्या पाळल्या जात आहेत एवढेच. म्हणजे केवळ भीतीपोटी, या समजांबाबत खरं काय आणि खोटं काय याची वैज्ञानिक तपासणी, तार्किकता, टाळण्यामुळे.
वर्षभरात चार ग्रहण होतातच. कधी सातही असतात. पृथ्वीवर ती सर्वत्र दिसतातच असेही नाही त्यामुळे कुठे ना कुठे गर्भावस्थेतल्या स्त्रियांना या ग्रहणाचा योग येतोच. मुळात पूर्ण दिवसांची ९६ टक्के बाळ चांगलीच निपजतात आणि चार टक्के बाळांमध्ये व्यंग असतात. पण ती जनुकीय असतात. त्याचा ग्रहणाशी कुठलाही शास्त्रोक्त संबंध नसतो,हे ध्यानात असू द्यावे.
वास्तविक ग्रहण पाळणं हीच विषाची परीक्षा आहे. ग्रहणात वेध लागल्यापासून गर्भवती बाईने एका जागी बसायचं, झोपायचं नाही, अन्न पाणी वर्ज्य करायचं हे अत्यंत भयंकर आहे. गर्भवतीला भूक लागते. तिने जर खाल्लं नाही तर रक्तातील साखर कमी होते आणि गर्भातले बाळही उपाशी राहते. त्यास हे साखरेचे कमीजास्त हेलकावे सहन होत नाहीत. एका जागी बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते, गुठळ्या होतात, लघवी कमी होते. हे सगळं काही तासांसाठी जरी असलं तरी कोणत्या फायद्यासाठी सहन करायचे? आणि मुळातच कोणताही शास्त्रीय आधार नसताना या विपरीत परिणामांना विनाकारण का आमंत्रण द्यायचे? शिवाय ग्रहणाला अशा तऱ्हेने घाबरण्याचे संस्कार पुढील पिढीवर का करायचे?
थोडक्यात अशा रीतीने हे मेंदूलाच लागलेले गिराण ठरते.
ग्रहण हा खगोलीय देखावा पहा की! सृष्टीतले हे घटित अनुभवा, अभ्यासा, विज्ञानाची नवीन दारे उघडा असे संस्कार नवीन पिढीवर झाले पाहिजेत. ग्रहण म्हणजे अशुभ काही नाही हा फक्त सावल्यांचा खेळ आहे. तुम्ही उन्हात डोक्यावर छत्री घेता म्हणून तुमच्यावर सावली पडते.तसेच या ग्रहणाबाबतीत घडते.
थोडक्यात पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यास सूर्यग्रहण होते आणि पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. म्हणजेच जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका रेषेत असतात तेव्हा ग्रहण दिसते. हा केवळ सावल्यांचा परिणाम आहे.
या खगोलीय घटनांमध्ये, वैश्विक पसारा
र्यात मानवाच्या समजुतींना कुठलेही, किंचितही स्थान नाही. तेव्हा कुत्रे, कासव, अस्वल, राहू, केतू सगळे बाजूला ठेवा आणि ग्रहणाचा अभ्यासात्मक, वैज्ञानिक अनुभव घ्या, विश्वातली रंजकता पहा.
राहता राहिले दान धर्माचे. दान ही एक सेवा आहे. ‘दे दान सुटे गिराण ‘म्हणून केलेले असो अथवा नसो ते केव्हाही करावे. ते भलेच काम आहे. त्यासाठी ग्रहणाच्या निमित्ताची फलदायी जोड लावायची काहीच गरज नाही. *दे दान सुटे गिराण* याचा अर्थ मी असा लावते की, अंधश्रद्धेमुळे मेंदूला लागलेले गिराण सोडवा आणि त्यास ज्ञानाचे दान द्या.
*राधिका भांडारकर पुणे*.
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________