You are currently viewing लहानपणीची दिवाळी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

लहानपणीची दिवाळी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम लेख*

*लहानपणीची दिवाळी*

दिवाळी ….सणांची राणी व प्रकाशाचा राजा दिपोत्सव…आणि खूप सुट्टी शाळेला.दिवाळीची सुट्टी म्हणजे आमच्या लहानपणी पर्वणीच असे.भुलाबाईची गाणी येतानाच मनात फेर धरत.
साधारण दसरा,कोजागरी होताच थंडीची सुरवात, दिवाळी जवळ आल्याची चाहूल देई.तेव्हा पर्यटनापेक्षा आपलं आणि मामाचं गांव,खेडंच प्रिय वाटे.वडील डॉ. त्यामुळे निरनिराळ्या गावी बदली होई.पण आम्ही आई सोबत प्रत्येक दिवाळी व उन्हाळ्यात
आमच्या खेडेगावी जात असू.काका किंवा मामा आमच्यासोबत येत असत.
तालुक्यातील गावापासून १२कि.मी.कच्च्या ,बैलगाडी च्या
वाटेने आम्हाला पोचायला दोन तास लागत.पण ते दमणीतून, खाचाखळग्यातून जातांना ही खूप मज्जा येई.छोट्या नली नाल्याचा उतार चढाव आला की एकमेकांना धरून सावरून बसत असू आम्ही बहिणभावंडं..सभोवताली हिरवीगार शेती ,आमराईने सारे शिवार हिरवेगार दिसत असे.
जवळपास सगळे मोठममोठे वाडे, घरे ,वाड्यातील नोकरीवर बाहेरगावी रहाणारे सगळे मुलंसुना ,नातवंड आपल्या मूळ गावी येअसत..घरं पाहुण्यांनी गजबजलेली असत.
लख्ख केलेली घरं..तेलपाणी लावून लाकडी दारं चकचकीत केली जात.दारांच्या, बंगईच्या पितळी फुल्या उजळल्या जात. छतालाही तेव्हा रांगोळी दिसली लहानपणी प्रश्न पडे की वर कशी काय काढली..अबोध,अजाण मनात प्रश्न यायचे. मग कळलं तक्क्या ,मोठी चौकोनी उशी त्यावर रांगोळी काढून ती छताला दाबून धरली की तेलामुळे चिपकायची व छत शोभिवंत दिसे.
फराळाच्या खरपूस ,खमंग,गोड व तळणाच्या वासाने दिवाळीची
सुरवात.फराळाचे पदार्थ ,चकल्या, शेव,लाडू ,शंकरपाळी,खाज्या,
करंज्या अनारसे.सगळी रेलचेल,मोठमोठे डबे भरून जात.चुलीवरच फराळाचे,स्वैपाक ही.गोवर्या ,तुराट्या,पर्हाट्या व सोबत लाकडी झिलप्या इंधन वापरत.आम्ही छान शेकत बसत असू.नरकचतुर्दशीच्या पहाटेच अभ्यंगस्नानाला आकाशात चांदण्या असतानाच ,थंडीत आई,आत्या उठवायचे, कुडकुडत उठून बसायचो सगळी भावंडं…..सुगंधी उटणे,तेही घरीच केलेले व सुवासिक तेल लावून कढत पाण्याने आंघोळी होत.
न्हाणीघरात तांब्याच्या हंड्यात
पाणी चुलीवर कडक होई व तांब्याच्या लख्ख घंगाळात ते काढलं जाई.सुगंधी साबणही.नवीन कपडे घालून,
पाटावर बसबून सगळ्यांना औक्षवण व ओवाळणं व दिवाळीचा ताजा फराळ सगळ्यांना दिला जाई.अंगण शेणसडा,रांगोळी ,रंग भरून ठिपक्यांच्या मोठमोठ्या रांगोळीने सजत असे.चांगले कपडे घालून फटाके उडवायचे.टिकल्या,सोबत बंदूक किंवा गोट्यानेच,फुलझडी,तारा,नाग़ाच्या गोळ्या,भुईचक्र,झाड असं मुलांना जमेल लावायला ते फटाके उडवायचे.पळसाची पत्राळी,जेवायला व फराळाला
कारण खूप जण रहात.पण तेच पर्यावरणपूरक होतं.पाडव्याला गोठ्यात गाईगुरं वासरांची झेंडू चे हार घालून पूजा,करत व गडी गाणी
म्हणत .लक्ष्मी पूजनाला दिव्यांची आरास व मातीच्या पणत्या लावलेल्या, प्रत्येक दार,अंगण,वृंदावन, विहीर,हौद,
न्हाणीघराच्या दारी ,गोठ्यात सर्वत्र पणत्यांच्या सात्विक प्रकाशात उजळून निघायचे.
आई,काकू,आत्या,बहिणी सगळे शालू ,दागिने घालून पूजेला बसत.फटाक्यांच्या लडी,राँकेट गजगोटे फोडत.
लहान मुलं घाबरत आवाजाला.
भाऊबीजेला बीजेची कोर दिसली चंद्रा ला ओवाळून जुनं घे नवं दे म्हणत कृष्णा ला घरात ओवाळून आलेल्या मामाला आई प्रेमाने ओवाळे आम्ही बहिणीही भावाला ओवाळून आई आधीच त्याच्या जवळ देऊन ठेवलेली ओवाळणी तो देताना कोण आनंद व्हायचा.
सगळ्या घरोघरी आलेल्या लेकी,जावयांना घरी चहा फराळाला बोलावून ओटी भरली जायची.सगळे सवंगडी,पाहुण्यांची मुलंमुली शेतात जायची,नदीवर जायची.
शंखशिंपले ,खडे खेळायला आणले की उत्साह दाटायचा.
मग दिवाळीची आवरसावर करून मामाच्या गावाला आम्ही रवाना होत असू.बस बदलत बदलत.आजीचा पाहुणचार,नवे कपडे,कौतुक करून घेत सुटी संपत येई.गाणी नाटक,नाच सगळं मोठ्यांना करून दाखवलं की आजोबा, मामा खूष होत.
अशी आनंदाची दिवाळी मनात भरून पुन्हा परतीचा प्रवास सुरू होई.पण मनात ती लहानपणची दिवाळी अजूनही स्मरत असते…….!

*अरूणा दुद्दलवार*
*दिग्रस यवतमाळ*✍️

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा