*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अंतराय*
मनात खूप दडलेलं असतं
वाटतं कधीतरी सारं बोलावं
काही आठवणी भल्या बुर्या
सांगून बोलून मोकळं व्हावं..
अश्वासक एक खांदा हवा
मायेची उबदार कूस हवी
मुखवटा काढून मुक्त व्हावं
डोळ्यातल्या पाण्याला वाट द्यावी..
गैरसमजाने उगीच काही तुटलं
रागाच्या भरात भलतंच झालं
पुन्हा एकदा प्रयत्न करुया
मनातल्या मनात पक्कं ठरवलं..
अव्यक्त होतं प्रेम अंतरातलं
खात्री नव्हती प्रश्नाच्या उत्तराची
म्हणूनच सारं बांधून ठेवलं
मौनात झाली राख भावनांची..
वाटा आपल्या वेगळ्या झाल्या
जगणं जरी थांबलं नाही
तरी एक लोंढा सोबत आहे
भेटीत पुन्हा बोलू काही…
आतले हुंकार ऐकू येतात
ढासळतोय् भावनांचा काठ
मुक्त आहे जीवन आता
जाण्यापूर्वी सोडू ही गाठ.
*राधिका भांडारकर पुणे*.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-