भाजपाच्या तालुका बैठकीत पालकमंत्र्यांच्या स्वागताचे नियोजन*
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम.रविंद्र चव्हाण साहेब हे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री झाल्यावर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात शनिवार दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी ३ = ०० वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येणार आहेत . तसेच त्याठीकाणी त्यांच्या हस्ते राज्यात शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे .
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रशासनाचे खास कौतुक करण्यासाठी येणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे भाजपाच्या वतीने स्वागत करण्यासाठीच्या नियोजनाची सभा तालुका कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वेंगुर्लेत जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले , तसेच महिला मोर्चाच्या वतीने पालकमंत्र्यांचे औक्षण करण्यात येणार आहे .
यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा चिटणीस निलेश सामंत , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , महीला अध्यक्षा स्मिता दामले , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर , महीला मोर्चाच्या सारीका काळसेकर , शक्तीकेंद्र प्रमुख विजय बागकर – महादेव नाईक – सुधीर गावडे , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , ओबिसी सेलचे रमेश नार्वेकर , माजी सरपंच विजय रेडकर , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , उदय गावडे , श्रीधर गोरे , देवेंद्र वस्त , वृंदा मोर्डेकर , रसिका मठकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते .