वेंगुर्ला :
श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला २९ व्या वर्धापन दीनानिमित्त श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला विद्यार्थी मित्र मंडळ आयोजित युवक शरीर सौष्ठव संस्था वेंगुर्ला यांच्या सहकार्याने वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाने आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन च्या मान्यतेने मानाची तिसरी “सिंधुदुर्ग क्लासिक २०२३” ही स्पर्धा श्री साई दरबार हॉल वेंगुर्ला येथे प्रेक्षकांच्या उस्पुर्त प्रतिसादात संपन्न झाली. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत मालवणचा प्रीतम शिंदे खेळाडू “सिंधुदुर्ग क्लासिक २०२३” चा मानकरी ठरला.
वेंगुर्ले येथील या स्पर्धेचे उद्घघाटन शिवसेना जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री जयप्रकाश चमणकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री विजय मोरे, श्री विजय तांडेल, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री नितीन मांजरेकर, शिवसेना शहर अध्यक्ष श्री उमेश येरम, आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू श्री किशोर सोनसूरकर, श्री संतोष परब, श्री रामचंद्र देवजी, पत्रकार श्री सुरेश कौलगेकर, श्री खानोलकर सर, सौ अबोली सोनसुरकर, श्री अमोल तांडेल, श्री दादा पेडनेकर, श्री विजय फेंद्रे, ऍड. मनीष सातार्डेकर, श्री. शैलेश केसरकर, श्री हेमंत चव्हाण, सौ साक्षी वंजारी , श्री विलास नाईक, श्री विनय धूरत आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान मानाचा सिंधुदुर्ग क्लासिक २०२३ चा विजेता फिटनेस वरियर मालवण चा प्रीतम शिंदे ठरला. त्याला कै. लक्ष्मी देवजी स्मरणार्थ श्री रामचंद्र देवजी पुरस्कृत भव्य मानाचा हनुमान चषक व रोख रक्कम, मानाचा किताब, प्रमाणपत्र, एच 2 ओ कंपनी श्री किशोर नारकर पुरस्कृत भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
बेस्ट पोझर श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ले चा चंदन कुबल, मोस्ट इम्प्रोवेड बॉडी बिल्डर च मान श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला च अंकित किशोर सोनसूरकर याने पटकावला, श्री विनय धूरत पुरस्कृत बेस्ट लोवर बॉडी पारितोषक बेस्ट जोकर फिटनेस सावंतवाडी चा आनंद राऊळ ठरला.अंतिम निकाल यामध्ये ५५ किलो आतील प्रथम क्रमांक हरीश रजपूत एम्पायर जिम कुडाळ, दुसरा क्रमांक अतुल दिकवलकर पॉवर हाऊस कणकवली, तिसरा क्रमांक चंदन कुबल श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ला, चौथा क्रमांक योगेश केरकर श्री सातेरी व्यायामशाळा, पाचवा क्रमांक रुपेश वंजारी एस.आर. के. फिटनेस कणकवली.गट क्रमांक २ मध्ये ६० ते ६५ किलो प्रथम क्रमंक आनंद राऊळ बिस्ट जोकर फिटनेस सावंतवाडी, दुसरा क्रमांक शंकर माने पावर हाऊस कणकवली, तिसरा क्रमांक शेर बहादुर बोगती यश फिटनेस सावंतवाडी, चौथा क्रमांक मेघश्याम धुरी श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला, पाचवा क्रमांक सहिल भिडीये स्वामींनी फिटनेस नांदगाव, गट क्रमांक ३ मध्ये ६० ते ६५ किलो गटात प्रथम क्रमांक, सहदेव नार्वेकर सोनसुरकर फिटनेस शिरोडा, दुसरा क्रमांक ज्ञानेश्वर आळवे गिअर अप कुडाळ, तिसरा क्रमांक रितेश केळुस्कर फिटनेस वॉरियर्स मालवण, गट क्रमांक ४ मध्ये ७० ते ७५ किलो गटात प्रथम क्रमांक प्रीतम शिंदे फिटनेस वॉरियर्स मालवण, दुसरा क्रमांक, कौस्तुभ वर्दंम स्वामींनी फिटनेस नांदगाव. आणि गट क्रमांक ५ मध्ये ७५ किलो वरील गटात प्रथम क्रमांक अंकित किशोर सोनसुरकर श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला, दुसरा क्रमांक गितेश चव्हाण फिटनेस वॉरियर्स मालवण, तिसरा क्रमांक आर्यन श्रीकृष्ण धारपवार यश फिटनेस सावंतवाडी याने पटकाविला.
या स्पर्धेचे पंच म्हणून श्री विजय मोरे,शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते अंतर राष्ट्रीय बॉडी बिल्डर राष्ट्रीय पंच, श्री अमोल विजय तांडेल, श्री हेमंत काशिनाथ नाईक, श्री विक्रांत गाड, श्री सुधीर हळदणकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला, वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशन, युवक शरीर सौष्ठव संघटना, कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली