You are currently viewing दिवस चौथा; कणकवलीत शुकशुकाट

दिवस चौथा; कणकवलीत शुकशुकाट

नगरपंचायतीच्या आवाहनाला शहरवासीयांकडून प्रतिसाद

कणकवली

लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी कणकवली शहरात शुकशुकाट पसरला होता. त्यातच रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने गेले तीन दिवस असलेली वर्दळ आज सकाळपासूनच काहीही मंदावलेल्या स्थितीत होती. मात्र, लॉकडाऊनच्या पहिल्या दोन दिवशी काही प्रमाणात सुरू असलेली अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची दुकाने आज मात्र पूर्ण बंद होती. त्यातच नगरपंचायतने शनिवार-रविवार दुकाने बंद ठेवा या केलेल्या आवाहनाला कणकवलीवासियांनी व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.

सोमवारपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने पहिल्या दोन दिवसासारखीच उघडली जाणार की रविवारसारखी पूर्णता बंद राहणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. आज सकाळपासूनच कणकवली पटवर्धन चौकात पोलीस तैनात होते. मात्र, नागरिकांची फारशी वर्दळ नसल्याने पोलिसांसह अन्य यंत्रणेलाही जास्त ताण घ्यावा लागला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 4 =