You are currently viewing सावंतवाडी शहराला ५६ कोटीची नळपाणी योजना मंजूर – बबन साळगावकर

सावंतवाडी शहराला ५६ कोटीची नळपाणी योजना मंजूर – बबन साळगावकर

सावंतवाडी

सुवर्ण जयंती योजनेमधून सावंतवाडी शहरातील नळ पाणी योजनेला ५६ कोटी १७ लाख रुपये मंजूर करण्यात झाले आहेत. त्यामुळे शहराला आता मुबलक पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे. यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न सुटला. गेली अनेक वर्षे रखडलेली नळपाणी योजना फक्त तीन महिन्यात श्री चव्हाण यांनी मार्गी लावली आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार व्यक्त करणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. या नळपाणी योजनेमुळे सावंतवाडी शहराला आता मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा श्री. साळगावकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा