You are currently viewing “कवितेला सत्याचा धर्म असतो!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

“कवितेला सत्याचा धर्म असतो!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

*कविवर्य नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन संपन्न*

पिंपरी

“कवितेला सत्याचा धर्म असतो. ती जातपात विरहित असते. कष्टकऱ्यांच्या सर्जनाचे मूल्य कधीही कमी होत नाही, हे अधोरेखित करणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या कवितेला संपूर्ण महाराष्ट्रात सांस्कृतिक घर लाभले आहे!” असे विचार ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गंगानगर, नेरळ (पश्चिम) येथे सोमवार, दिनांक ०१ मे २०२३ रोजी व्यक्त केले. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे उद्घाटन करताना प्रा डॉ श्रीपाल सबनीस बोलत होते. कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे प्रदीप पाटील, सुर्वे यांच्या कन्या कल्पना घारे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ. जगदीश कदम यांना (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान), कविवर्य अरुण म्हात्रे (कवी केशवसुत स्नेहबंध पुरस्कार), रजनी उद्धव कानडे (मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान), डॉ. अभिजित पाटील (‘आयसीयूच्या काचेतून’) आणि नंदकुमार मुरडे (‘दस्तऐवज शब्दांचा’) यांना अनुक्रमे (नारायण सुर्वे काव्यप्रतिभा आणि शब्दप्रतिभा पुरस्कार) प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर नागनाथ पाटील (‘सावली हरवलेलं झाड’), मनीषा पाटील (‘नाती वांझ होताना’), डॉ. कैलास दौंड (‘आगंतुकाची स्वगते’), खेमराज भोयर (‘सालं अतीच झालं’), अस्मिता चांदणे (‘काट्यातून उडती पंख’), प्रवीण पवार (‘भुई आणि बाई’) यांच्या साहित्यकृतींना (नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. जगदीश कदम यांनी “बापाच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे असे मी मानतो!” या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. प्रदीप गांधलीकर आणि मानसी चिटणीस यांनी मुलाखतींच्या माध्यमातून अरुण म्हात्रे तसेच रजनी कानडे यांच्या भावना जाणून घेतल्या. ‘नारायण सुर्वे यांचे वारसदार’ कवी म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या श्रीनिवास मस्के (नांदेड), वसंत पाटील (सांगली), आत्माराम हारे (पिंपरी), प्रभाकर वाघोले (तळेगाव) तसेच प्रा. डॉ. अनिल काळबांडे, उद्धव कानडे, ललिता सबनीस आणि सर्व पुरस्कारार्थींनी वैविध्यपूर्ण कवितांचे सादरीकरण करून काव्यजागर केला. काशिनाथ नखाते यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “कामगार हाच क्रांतीचा वाहक असून साहित्यिकांनी वेळोवेळी कामगार चळवळींना पाठबळ दिले आहे!” असे मत व्यक्त केले.

सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम सदाफुले, गणेश घारे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, जयवंत भोसले, अरुण गराडे, धनंजय सोलंकर, एकनाथ उगले यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा