वेंगुर्ला
विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन वेंगुर्ला तर्फे कालकथित विनोदिनी आत्माराम जाधव यांचे स्मरणार्थ देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार सन २०२१-२२ साठी कणकवली शिवडाव येथील कवी आणि आरोंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने‘ या काव्यसंग्रहाला जाहिर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण २७ मे रोजी वेंगुर्ला येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फाऊंडेशनतर्फे देण्यात आली आहे. याचवेळी कोविड न्रादुर्भावामुळे वितरीत न करण्यात आलेले सन २०१९-२० व सन २०२०-२१ मधील पुरस्कार विजेते अनुक्रमे कल्याण श्रावस्ती व बुद्धभूषण साळवे यांनाही एकाचवेळी वितरीत करण्यात येणार आहेत.
‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने‘ या संग्रहातील कवितांमधून आजच्या अराजकसदृश्य काळाचा व त्यातील विसंवादाचा परामर्श घेत असताना, येणा-या काळासाठी एक आशावादी स्वर प्रकट होत असताना दिसतो असे मत काव्य पुरस्कार निवड समितीने केले आहे.