You are currently viewing २३ रोजी निरवडे -कोनापाल येथे निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

२३ रोजी निरवडे -कोनापाल येथे निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :

 

श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थान निरवडे कोनापाल आयोजित अंखड हरिनाम सप्ताहानिमित्त निरवडे कोनापाल येथे श्री देवी भराडी मंदिरात गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता उद्धाटन व ६ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

यात सायंकाळी ६ वाजता विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ,आंबेगाव (बुवा- गोविंद मेस्री) सायंकाळी ६.४५ वाजता उमळकर प्रासादिक भजन मंडळ,कुडाळ (बुवा – अमित उमळकर) रात्री ७.३० वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा – प्रसाद आमडोसकर) रात्री ८.१५ दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी (बुवा – विराज तांबे) रात्री ९ वाजता लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली (बुवा- योगेश मेस्री) रात्री ९.४५ मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरुर (बुवा – भार्गव गावडे) रात्री १०.३० वाजता समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगांव (बुवा – गौरांग राऊळ) रात्री ११.१५ वाजता ईसवटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड (बुवा – सचिन सावंत) रात्री १२ वाजता सद्गगुरुनाथ प्रासादिक भजन मंडळ, तुळस (बुवा – सिद्धेश नाईक) रात्री १२.४५ वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा – रुपेश यमकर) हे संघ सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक ७००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ३००१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक १५०१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक १५०१ रुपये व सन्मानचिन्ह तसेच उकृष्ट गायक १००१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट हार्मोनियम १००१ व सन्मानचिन्ह, उकृष्ट पखवाज १००१ रुपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट तबला १००१ रुपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट झांजवादक १००१ रुपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट कोरस १००१ रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा