You are currently viewing माजगाव येथील कु. भक्ती दळवी ही वेस्टन डान्स स्पर्धेत देशात दुसरी!

माजगाव येथील कु. भक्ती दळवी ही वेस्टन डान्स स्पर्धेत देशात दुसरी!

सावंतवाडी :

माजगाव सावंतवाडी येथील कु. भक्ती प्रभाकर दळवी या तरुणीने चमकदार कामगिरी करीत वेस्टर्न डान्स ऑल इंडिया या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. ऑल इंडिया ८ डान्स चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा पणजी गोवा येथे दि. १५/१६/१७ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाली. दरम्यान या स्पर्धेत तिने स्वतःच्या नृत्य कौशल्याने राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.

सिने अभिनेत्री व नृत्य विशारद सुधा चंद्रन यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला.  शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची ती पुतणी आहे. तिचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा