You are currently viewing पावसाळ्यापूर्वी होणार कणकवलीतील गटार सफाई!

पावसाळ्यापूर्वी होणार कणकवलीतील गटार सफाई!

पावसाळ्यापूर्वी होणार कणकवलीतील गटार सफाई!

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून शहरातील कामांचा आढावा

पावसाळ्यापूर्वी सर्व कामे मार्गी लावण्याच्या सूचना

कणकवली

कणकवली शहरातील गटर साफसफाई व शहर स्वच्छता व पावसाळ्या पुर्वीचे नियोजन 2023 च्या व्यवस्थापनाबाबत कणकवली नगरपंचायतच्या वतीने नुकतीच नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयात बैठक घेत सूचना दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर धुमाळे,विनोद सावंत, स्वच्छता निरिक्षक, सतीश कांबळे विद्युत विभाग लिपिक, मनोज धुमाळे, पाणीपुरवठा लिपिक, विभव करंदिकर, स्थापत्य अभियंता, ध्वजा उचले, स्वच्छता निरिक्षक हे उपस्थित होते. या बैठकीत पावसाळ्यापूर्वी गटर साफसफाईचे काम 04/05/2023 रोजी ते दिनांक 25/05/2023 रोजी पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कणकवली नगरपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट समोरील वाढलेल्या फांद्या कटींग करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.अतिवृष्टी मुळे उन्मळून पडलेल्या वृक्षांची तोडकाम करण्यासाठी वुड कटर मशीन व इतर साहित्य अद्यावत ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यात निर्माण होणा-या पुर स्थिती नियंत्रणाकरीता आपत्कालीन कर्मचा-यांसहित जे.सी.बी., ट्रॅकटर व इतर अनुषंगिक साहित्य अद्यावत ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या. पावसाळी साथरोग नियंत्रणाकरीता भंगारवाले, नवीन बांधकाम चालू असलेले बांधकाम व्यवसायिक व इतर राज्यातून आलेले कामगार यांना साथरोगाबाबत सूचनांचे पत्र देण्याबाबत व आरोग्य तपासणी करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डास उत्पत्ती होऊ नये म्हणून ऍबीटींग व डास फवारणी करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पीडीत लोकांना रहाण्याकरीता जि.प.शाळांना निवारा केंद्र म्हणून वापर करण्याबाबत संबंधितांशी पत्रव्यवहार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पावसाळ्या पुर्वी पाणी शुध्दीकरण्याकरीता नगरपंचायत हद्दीतील सार्वजिक विहिरींमध्ये टी.सी.एल. टाकाणे व टी.सी.एल.चा साठा करून ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी नळ पाणीपुरवठा शुध्दीकरणाकरीता टी.सी.एल.चा साठा करून ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या.
तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा