You are currently viewing मिलाग्रीस हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय निवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे निधन

मिलाग्रीस हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय निवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे निधन

*मिलाग्रीस हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय निवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे निधन*

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, भोम येथील रहिवासी आणि सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय निवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ११.३५ वाजता निधन झाले. सायंकाळी आजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शशिकांत निखार्गे हे सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूल मधून निवृत्त झाले होते. इतिहास सारखा गंभीर विषय शिकवत असले तरी निखार्गे सर मितभाषी आणि सदा हसमुख, आनंदी स्वभावाचे होते. ज्यांच्या सहवासात यायचे त्यांच्यासाठी सदैव हवेहवेसे वाटणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. हसरा चेहरा आणि मायेने, प्रेमाने बोलणे यामुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जायचे. इतिहास बरोबरच ते स्काऊट आणि गाईडचे शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. मुलांचे शिक्षक म्हणूनच नव्हे तर पालक असल्यासारखा त्यांचा मुलांमध्ये वावर असायचा. त्यामुळे आजही त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना भावना अनावर झाल्या. गेली दीड दोन वर्षे अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांचे सहकारी शिक्षकवृंद नेहमी त्यांच्या भेटीस जात असायचे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रसाद, सून, अमेरिका स्थित विवाहित दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा