*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी शान भारताची….*
मी भारतीय आहे मी शान भारताची
मज पुरेपुर जाण आहेच कर्तव्याचेी..
मज प्रिय माझी माती मी लावतो कपाळी
उठताच पक्षी गाती मज साठी ती भूपाळी…
प्राचीवरी उदेला रविराज पाहतो मी
मी भाग्यवान किती महाराष्ट्री राहतो मी
उपजाऊ माय माती उपकार थोर तिचे
ऋण फेडण्या सुसज्ज सुपुत्र हो सतीचे…
सेवेस अर्पूनी ती सीमेवरी बडदास्त
ती थंडी ऊन वारा ते घालतात गस्त
जीवावरी उदार अर्पून प्राण त्यांचे
उतराई कसे व्हावे त्या वीर जवानांचे…
ही मायभूमी माझी प्राणाहूनी प्रिय
सुजलाम सुफलाम सागर चरण घोय
किती परंपरा थोर ही बुद्धिमान भूमी
नरवीर जन्मले ते येथे कितीक नामी…
वंदितो चरण रोज धलिकण माळतो मी
माझ्याच भूमीवर दररोज भाळतो मी
मांडीवरी तिच्या मी घेईन चीरनिद्रा
ती शकुन साजरी हो आहे पहा सु भद्रा….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २७ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी ४/५२
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-