You are currently viewing जरा जड जातं

जरा जड जातं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार आण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जरा जड जातं*

प्रियकर पती करणं
सोपं असतं सहजा
पण पती प्रियकर होणं
जरा जड जातं

जोडलेलं नातं अधिक
घट्ट करता येत पण
तुटलेलं मन जोडणं
जरा जड जातं

आधी मुलगी नंतर आई
जगभरात होतात
पण सुनेची मुलगी होणं
जरा जड जातं

स्वार्थासाठी धावपळ
जो तो करीत असतो
पण निस्वार्थी चालणं
जरा जड जातं

आजकाल वाईटांच्या मागे
तुडुंब गर्दी चालते पण
चांगल्या साठी वेळ देणं
जरा जड जातं

लबाड्या करून येथे
सुख प्राप्त होत म्हणे
तरी शांत झोपणं
जरा जड जातं

रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 1 =