मद्य प्राशन, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा असणाऱ्या व भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या 575 जणांवर कारवाई
– सौरभ कुमार अग्रवाल
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात 19 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 2 इसमांवर, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लाऊन वाहन चालविणाऱ्यावा 353 वाहन चालकावर, वाहनांना काळ्या काचा लावून वाहन फिरविणाऱ्या 169 वाहन चालकावर तसेच वेगाने डंपर चालविणाऱ्या 38 डंपर चालकावर तसेच भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या 15 वाहन चालकावर जिल्हा पोलीस दिलातर्फे कारवाई करण्यात आलेली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे सर्व नागरीकांनी वाहतुकीचे नियमन काटेकोरपणे करण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 19 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या कालावधीत वाहतुक नियमन विशेष मोहिम राबविण्यात आदेश दिलेले आहेत.
अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अमर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाहतुकीचे नियमन न करणाऱ्या विरुध्द सर्व पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखामार्फत वरील कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली.
जिल्हयात यापुढेही वाहतुकीचे नियमन न पाळणाऱ्या वाहन चालकावर दंडासहीत कारवाई करण्यात येणार सदर कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असुन असुन सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमन पाळून जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आवाहन केलेले आहे.