You are currently viewing अर्चना ‌घारे – परब यांनी जाणून घेतल्या व्यापारी वर्गाच्या समस्या

अर्चना ‌घारे – परब यांनी जाणून घेतल्या व्यापारी वर्गाच्या समस्या

अर्चना ‌घारे – परब यांनी जाणून घेतल्या व्यापारी वर्गाच्या समस्या

सावंतवाडी

वेंगुर्ला येथिल नियोजित कार्यक्रमाला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी तळवडे गेट गणपती कॉम्प्लेक्स येथे थांबून तेथील उपस्थितांची भेटी घेतली. व्यापारी वर्गाशी संवाद साधत अर्चना घारे यांनी व्यापारी बंधूंच्या समस्या जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान श्री. संतोष भैरे, श्री. निवृत्ती आमरे, श्री. एकनाथ सावंत, श्री. गोडकर, श्री. मिलिंद पवार, श्री. दळवी, श्री. कांबळी यांच्याशी बांधकाम कामगारांच्या समस्या इतर व्यावसायिकांच्या अडचणी तसेच तळवडे गावच्या भविष्यातील विकासासंबंधी सांगोपांग चर्चा केली.

तसेच श्री. अमोढ पावणोजी (होडावडा), श्री. दत्तप्रसाद कुंभार या हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. वाढती महागाई, खाद्यपदार्थांचे वाढते भाव, व्यवसाय चालविण्यासाठी करावी लागणारी कसरत यासंबंधीची माहिती अर्चना घारे यांनी घेतली. होडावडे गावातील लोकमान्य उपहार गृह येथे देखिल भेट दिली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे होडावडा गावचे माजी अध्यक्ष श्री. विलास नाईक, श्री‌. प्रकाश नाईक, वेंगुर्ला तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. पेडणेकर यांच्याशी चर्चा विनिमय केला. त्यानंतर श्री. पेडणेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सौ. अर्चना घारे परब वेंगुर्ला येथील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षा नितिशा नाईक, युवती अध्यक्ष सावली पाटकर, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा