You are currently viewing अपघातातील जखमीबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून विचारपूस…

अपघातातील जखमीबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून विचारपूस…

गरज पडल्यास जखमींवर पुढील उपचार करा; शल्य चिकित्सकांना दिल्या सूचना…

सिंधुदुर्गनगरी

वऱ्हाडाचे वाहन वागदे येथे पलटी होवून झालेल्या अपघाताबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधून चौकशी केली. तसेच गरज पडल्यास गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलवणे आवश्यक असल्यास तशी तयारी ठेवण्याबाबत आणि आवश्यक त्या उपचाराबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. वऱ्हाड घेवून देवगडकडे जाणारे वाहन पलटी होवून झालेल्या अपघाताची माहिती पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी तात्काळ घेतली आणि विचारपूस केली. जखमींवरील उपचारात काहीही कमतरता पडता कामा नये. गरज वाटल्यास आवश्यक त्या जखमींना पुढे शिफ्ट करण्याची तयारी ठेवा, अशा सूचना पाटील यांना केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − two =