You are currently viewing दुचाकी समोरासमोर धडकून अपघात , 1 ठार तर 2 जखमी

दुचाकी समोरासमोर धडकून अपघात , 1 ठार तर 2 जखमी

इन्सुली

इन्सुली क्षेत्रफळ तिठा येथे दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात सावंतवाडी येथील एक परप्रांतीय कामगार ठार झाला आहे. ही घटना आज साडे बारा वाजता घडली. बाबू थारू चव्हाण (वय ३८ रा. सावंतवाडी-भटवाडी, मुळ रा. विजापूर) असे त्याचे नाव आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना अधिक उपचारासाठी बांदा येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा