You are currently viewing वागदे हॉटेल वक्रतुंडसमोर भीषण अपघात…

वागदे हॉटेल वक्रतुंडसमोर भीषण अपघात…

अपघातातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…!

लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जात असताना घडली दुर्घटना…!

कणकवली

वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर बोलेरो पिकप ने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात जवळपास 25 अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. देवगड पाडगाव च्या दिशेने जाणारे हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकअप चालकाने डिव्हायडरवर पिकप गाडी चढवल्याने महामार्गावर पिकप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोक्याला,हाता पायाला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच महामार्गावरून जाणाऱ्या राजा पाटकर यांच्यासह वागदे सरपंच संदीप सावंत, यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जि प उपाध्यक्ष रंजन राणे, हृतिक नलावडे, यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अनेक अनेकांना गंभीर दुखापत झाली असून रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा