You are currently viewing थूकरटवाडीतला तमाशा

थूकरटवाडीतला तमाशा

*ज्येष्ठ लेखक भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लघुकथा*

*थूकरटवाडीतला तमाशा*

जस्सी गावची जत्रा जवळ इईल तसतस्सी गावकरी मंडळी, बाया, पोर जत्रेच्या गप्पा चवीनं करायला लाग्ली.मागच्या वर्षीची अन् येणाऱ्या नवीन जत्रेची तयारी हेचीच गुस्ठी गावात, पारावर,देवळात, चीचच्या वट्यावर, शेतात,शेताच्या बांधावर, हिरीवर जिथ चार माणसं मिळत्याल तित तीत जत्रेचीच चर्चा व्हयची. गेल्या वर्षीच्या जत्रेत आलेल्या वाईट अनुभवाची तर रंगीत तालीम व्हयची. म्हणचाला तर खळ्यावर बकऱ्याचा ढवारा अस्तो कणाय!!!! आन मग त्येची आमटी कशी चवदार ग्वाड लागतिय आंग तस्सिच चविष्ट चर्चा व्हायची. आन उंबर्ग्याची चव म्हणायचं झालं तर नाईचाकूरला गेल्यावर पवाराच्या सतीश भाऊकड दाळ आमटी खातो की नाही तशीच चव त्या तमाशात झालेला गोंधळाची व्हायची. हाच ईषय ज्यास रेटाणी बॉलला जायचा. दरवर्षाला तमाशा सुरू झाला की कुणी ना कुणी गोंधळ करणार म्हंजे करणार!!!! ते ठरलेलच असायचं. त्याच्या बिगार आनंदच नसायचा…. अशी सवय गावाला लागूनच गेलेली…
रंगात आलेला तमाशा बंद पडणार,पुन्हा सावरा सावरी व्हणार. पुना तमाशा चालत राहणार. असाच परत्येक वर्षाला थूकरवाडीतला तमाशा भलता रंगायचा.
थूकुरटवाडी कशी म्हणाल तर तशी लय भारी… गावाला पाणथळ, माथा, डोंगर, झाडी झुडप, सीताफळ, आंबे, तसं आजू बाजूनी नटलेलं गाव. पर गावाला कुठल्याच बाजूनी पक्का रस्ता नसलेलं. एकदम डोंगराच्या उतारात मरीआई वड्याच्या वसंगळीला इसावलेलं गाव.
या गावाला किती जाती म्हणचाल तर समद्या जाती व्हत्या.त्यात मराठा, महार, मांग, धनगर, बेरड, कोळी,तेली, वाणी आव सांगायचं झालं तर अठरा पगड जातीच हे गाव.पर ह्या गावावर मराठ्याचा आन वाण्याचा वचक ज्यासच असायचा. या दोन्ही जातिकड जास्तीच्या जमिनी व्हत्या. समद्या गावची गुजरान ह्याच्याच शेतावर व्हायची.
त्याच्यात दोनच बामणाची घर तरीबी त्यास्नी बरीच मान मानतुक असायची. देवाधर्माचं म्हणलं की बामना शिवाय काडी हलायची न्हाई. असं हे गुण्यागोविंदाने राहणार, राबणार गाव. गावामदी म्हशी, शेर्ड्या, मेंढरं, गाई वासरे, कोबड्या भरपूर असायच्या.
पहाट झाली की कोंबडे आरवायला लागलेच म्हणा मग शेरड्या त्येंची पिल्ल, मेंढ्या, गाई ,कुत्री, म्हशी यांचा माणसा परीस जासच कालवा असायचा.लोक धारा धुरा काढून झाल्या की दिवस उगवायच्या वक्त्याला. समदी जनावार,शिर्डी, कोकर , बरडाच्या माळावर विसाव्याला जायची. मुरमाड जमीन आन निपळाई असल्यामुळ ही संमदी जनावार चार दोन तास तिथच विसावायची.
पर ह्या गावात अजून लाईट आलीच न्हवती. कालिदास बापूच्या टुकटूकीवर समद गाव दळून आणायचं. तवा राकेलवर चालणारी एकच पिठाची गिरणी व्हती. दिवस मावळला की त्या डोंगराच्या खाइत हे गाव गुडूपच व्हायचं म्हणा की.
ह्या गावात दर वर्षाला घुढीपाडव्या दिवशी गावाची जत्रा भरायची. मग काय परगावी दिलेल्या लेकी बाळी, सोयरे धायते, थूकरटवाडीला आदल्या दिवशी पसूनच यायला सुरू व्हनार. सालभर वसाड पडलेली वाट, पाडव्याच्या आदल्यादिशी पसून समदी पांढर दिसायची. मग जत्रेच्या वक्ताला दोन दिवस वाट रुळून जायची. कुणी चालत, कोणी सायकलीवर तर कोणी बैलगाड्या घिऊन गावाला यायचे. तवा गावात जर कुणी सायकल घीऊन आलं……तर,लेकरं बाळ, बाया माणसं टक लावून बघायचे….. कोण, कुणाचा, कुठून अशी त्या सायकल वाल्याची चर्चा व्हायची…. मग गावातली बारकी बारकी पोरं त्या सायकलीच्या कडणी जमा व्हायची. चाक भिंगतय म्हणून पायेंडेल हलवून चाक फिरवायची. तवर ज्यांच्या घरी पावण आलेलं हायत कणात तिथल्या पोरांनी न्हाईतर मोठ्या माणसांनी या बारक्या पोरांना हाकलून दयायचं.
काय सांगायच मग!!!!! कोणच्याबी गोष्टीच कौतुकच की!!!!
जत्रा तशी दीड महिना म्होरं हाय म्हणताच गावच्या मारुतीच्या नाहीतर पिंपळाच्या वटेवर समद्या गावाची सभा भरायची. आदल्या दिवशी सानच्याला दवडी द्यायची. तवा दवडीवाला घोट दोन घोट लावून हलकी तयार ठेवायचा. मग नशेमध्ये समद्या गावात डुलत डुलत, हलगी वाजवीत दवंडी द्यायचा… उद्या रामपाऱ्यात ssss जत्रेची सभा हाय होय ssssss समद्या माणसांनी हाजीर रहाsssss असी दवंडी राच्याला आयकू आली की माणसाली जत्राच भरल्याचा आनंद व्हायचा. मग काय झाली चर्चा सुरू. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या परीस लवकरच आडावर गर्दी व्हायची. माणसं भराभर घागरी म्हाग घागरी घीहून आंगुळ पांगुळ करून
जीबी घरातल्या बोचक्यात, सल्लदात, वळचणीवर, खाटीला आडकवलेली जरा बरी दिसणारी सोयऱ्याकड, गावाला, बाजाराला लिऊन जाण्यासारखी कापड चुरगळलेली का हुईना जरा पांढरी धोट दिसणारी घालून लोकं मिटींगला यायचे.मग काय
समद्याच्या म्होरं ईष्णू पाटील, नागा बामन, वाण्याचा मिटू, वाघमारेचा शिर्मंता, गरडाचा आरून, कांबळयाचा दिलीप, डोक्याच्यातला नद्राज, उगल्याचा इलास, गावातली ही कर्ती मंडळी पुढ बसायची. मग समदा गाव आजूबाजूला बसून गावची सभा सुरू व्हायची. गावातले सरपंच न्हैतर पोलीस पाटील सभा सुरू करायचे. मागच्याच वर्षी नवीनच सरपंच झालेला माण्याचा तुका नाना , उमदा माणूस उठला. धोतराचा खोश्या सावरून नाक पुशित टोपीला थोड सरळ करून खाकरून बोलायला सुरू केलं. सालाबादा परमानं ह्याबी वर्षी आपण जत्रा करू. समद्यांनी जीबी ठरल ती पट्टी वक्तला द्यावी. आनंदानं जत्रा साजरी करावी. भांडण तंटे करू नाई. असं तुका नाना म्हनल्याबरूबर नसेत धुंद असलेले इसा चेअरमन उठले अरे नव्या पट्टीच बोलताव!!! मागच्या हिशोबाचं काय??? ते मांडा की!!! मागचा हिशोब द्या!!! मगच नव्या पट्टीच बोला.,!!! असं म्हणल्या बरूबर गावातले लोक चौकारले….. सभेत बसलेला एक जण बरोबर बरोबर म्हणला. गाव बिघडल. आतल्या आत चाव चाव बघून ईष्णू पाटील उठलं. तेच गाव गप झालं. पाटील म्हनले!!! अरे येडझव्यानु मागच्या सालाचा हिशेब कागदावर लिहून ईसिवर चिटकवला व्हता, त्येव् वाचला कार sss???? इसारलाव का काय sss??? आर रानगटानू वाचायला येत नाही, त्याला आमी काय कराव!!!! तरीबी म्या सांगतो.आसं म्हणुन हिशेब सांगायला सुरू केलं. सातशे रुपये पट्टी जमा झालती. पाचशे रुपये तमाशाला, दोनशे रुपये उडवायच्या दारूला. तीस रुपये नारळ हाराला. इस रुपये वाजंत्री, समदे पैसे झाले….. म्हटल्याबरोबर गाव शांत झाला. विक्रम वाघमारे मध्येच धुंदीत कलत कलत उठला. झाला झाला हिशोब झाला!!!!.आता पुढच्या जत्रेच बोला!!!! हा ssss अंग कसं पाटील म्हणले. पुढ पाटील बोलायला लागले. बघा बाबांनु!!!! हा समद्या गावाचा,सणासुदीचा, जत्रेचा कारभार हाय. समद्या माणसांनी एकुपा ठीवला तर, गावाचं नाव व्हणार हाय. नाहीतर गावाचा तमाशाच की!!!!जत्रा करायची तर ती समाधानानं व्हायला पायजेल.आन हो महागाई वाढलिय म्हणून ह्या वर्षी पर ऊब्रा इस पंचवीस रुपये तरी पट्टी करावी लागल. असं म्हटलं की लोक डोळे मोठे करून बघायले. मग पोलीस पाटील बोलले. सालाची जत्रा हाय. वेळेवर पट्टी जमा करा. असं म्हणून पाटील खाली बसले. ईसा चेअरमन पुन्हा उठला.आता इसा काय बोलून पच्कतोय का काय आसाच लोकाली वाटलं. उटला तेच त्येन खिशातली पन्नासाची नोट भाईर काढली. ही घ्या आमा दोगा भावाची. म्हणून पंचा म्होरं ठीवली. समदया लोकानी नोटाकड बघत समाधानानी माना हलविल्या. मग काय पट्टी द्यायल सुरुच झालं. एका म्हाग एक समद्या लोकांनी पट्टी जागेवर जमा कीली. बामणाच्या नागा अण्णानी कागदावर समद्या लोकांची नाव आन वर्गणी लिहून ठीवली.
आता राहिला शेवटचा ईषय त्यो म्हणजी तमाशा कुठल्या गावचा आणायचा, पांगरीचा, आणायचा की बार्शीचा , भोस्याचा, का सोलापूरचा मग काय चर्चेला रंगच आला. कारण तमाशा हा या जत्रेचा महत्त्वाचा विषय व्हता. तमाशा शिवाय जत्रा पूरी व्हतच नव्हती.
ह्या वर्षी चांगलं पिकलय आनंदी आनंद हाय. मग आपूण सोलापूरचा तमाशा आणू. अशी चर्चा झाली. संमदे लोक खुश झाले. विष्णू पाटील बोलले यावर्षी सोलापूरचाच तमाशा आनु. त्याच्यात नाचणाऱ्या बाया हाईत. आता पस्तोर नाच्याच असणारे समदे तमाशे आपल्या गावान आनलेलं हैत. आता बाया मिळत्यात पर पैका जास लागल बारका. असं म्हणल्याबरूबर एक मिनिटात गावकऱ्याचा चेहरा मोहरा बदलून गेला. लोकांनी पाटलाच्या नावानी टाळ्या वाजवूनच स्वागत केलं. सभा संपली. प्रत्येक माणूस आपापल्या घरी,कुणी शेतावर नीगून गेला.
मग काय समदा गाव पाडव्याची वाट बघत. हळूहळू लगबग सुरू झाली. जत्रा जवळ यियील तशी लेकी, बाळी, पै पाहुणे निरोप धाडायला माणसं कामाला लागली.
सबेत ठरलं तसं चार करती मंडळी सोलापूरला टरकात बसून तमाशगिराला भेटायला गीली. सुपारी दिली. बोलणं झालं. तमासगिराणी पाहुणचार केला. चहापाणी करून माणसं परत फिरली….
सोलापूरचा तमाशा त्यात नाचणाऱ्या बाया याची गावभर चर्चा सुरू झाली. आडावर बाया पाणी सेंदायला आल्या की एकमेकीला बोलायला लागल्या. तवा गावातली कस्तुराबाई सिमिंतीला म्हणलीच!!! अग तुला माहितीय का, ह्या वर्षी तमाशात बाया नाचणार हाईत. अग गेल्या वर्षी बाबा बाईची कापड घालून नाचला ssss तर हेवढा गोंधळ झाला ssss ह्या वर्षी बाया नाचायला आल्या तर गावाचं कसं होईल??? म्हणून गावातल्या बऱ्याच बाया थिनलेल्या दिसत व्हत्या. बिथरल्याच म्हना की, तर कुणी कुणी हसत बी व्हत्या…. काय माय…. ह्या गावाला कस करावं काय की…..,बायाली मातर जत्रा संपुस्तोर धुक धूकीचं असायची. कारण प्ररत्येक जत्रेत कोणाची ना कोणाची कुरापत, भांडण, मारामाऱ्या ठरलेल्याच. गेल्या वर्षीचा सूड कधी कधी उगवीण्यासाठी तरणी पोर ईचार करूनच असायची.
जत्रा दोन दीसावर ईऊन ठीपली. लेकी बाळी पै पावणे यायला सुरू झालं. गाव गजबजायला लागला. बायानी घर दार सेनानी सारवा सार्वी करून गाव सुंदर दिसायला लागलं. गाव सजवायचं, देवळ,चावडी सजवायची, ह्या कामी लोक कामाला लागले. झिरमळ्या लावायला लागले.नारळाच्या फांद्या, केळीचे खुटं लाऊन तयार झाले.
पाडव्याच्या जत्रेचा दिवस आला. पहाटेपासूनच देवाला नारळ फोडायला सुरू झालं .पूजाअर्चा सुरू झाली. सारा गाव आनंदून गेला. देवळात तेला,तुपाचा आणि उदबत्तीचा वास घुमत व्हता. फुलांची आरास देवा म्होरं लागलेली. हो हो म्हणत दुपार आणि तिसराकपारबी झाली. लोकांच द्यान आता तमासगिराकड लागलं. गावाला येणाऱ्या प्रत्येक बैलगाडीत तमासगीर असल्यासारखं वाटायला लागलं. तिसराकपरा. फुफुटा दिसायला लागला. एका मागून एक एक दोन बैलगाड्या बगोस्तोर गावा भाईरच्या बाजूला असणाऱ्या चावडीकडे वळाल्या. तमासगीर उतरले. तसं समद गाव त्या तमासगिराकड बघायला लागलं.अहो काय सांगायचे!!!! बारकी बारकी पोर सुद्धा तूरमंड दीऊन बघायला लागले..आता पोर बघत्यात म्हणल्यावर बारक्या बारक्या पोरीबी बघायला आल्याच की त्या निष्पाप जीवाला काय माहिती!!! तमाशा काय असतो तो….. कुणीतरी मध्येच म्हणलं ये ssss पोरींनो जा घरला!!!! असं म्हणलं की पोरी भनान झाल्या.
त्या बया .त्या कशा. तो वाजविणारा.ती घुंगरू, ती ढोलकी ते तुणतुणं समदे लोक यांच्याकडे बघायला लागले. आता काय सांगायचं !!!! अख्या गावाची रीग या तमाशा भोवताली लागून राहिली.
दिवस मावळतीला गेला. तशी चावडी म्होरं झाडझुड सुरू झाली. प्रत्येक घरातून पुरणपोळ्या चपात्या जे जे उरलेल. ते ते समद्यानी आणून दिलं. समद्यांची जेवण झाली. रात्रीच्या आठ नऊ वाजायच्या वक्त्याला तमाशा सुरू झाला. ढोलकी घुमायला लागली. चाळ वाजायला लागले. तुंतुण्याचा आवाज , पेटीचा आवाज गीतांनी आणि घुंगराणी ताल धरला. गणगवळण सुरू झाली. टोपीवाल्यांच्या टोप्या, फेटेवाल्यांची फेटे आता वाऱ्यावरती उडायला लागले. माणस चेकाळायला लागली. मध्येच गाण्याचा ठेका सुरू झाला.नाचणाऱ्यांनी नाचकाम सुरू केलं. बघता बघता गणगवळण संपली.
आणि आता गाण्याची जुगलबंदी सुरू झाली. एक रुपया देऊन सुरू झालेले गाण ते दुसऱ्यांनी थांबवायचं. मग त्यांन दोन रुपये द्यायचे. गाणं दुसरं सुरू व्हायचं.मग ते गाणं तिसऱ्याने बंद करायचं. तीन रुपये द्यायचे मग ते गाणं चौथ्याकडे जायचं. जो जास्त पैसे देईल त्याचं गाणं सुरू व्हायचं. लोकांनी एक गाणं कधीच पूर्ण होऊ दिला नाही.
तवा दुसरं, तिसरं, गाणं काय कधी पूर्ण झालंच नाही. पैसे फुल्ल उधळले. गाणं तोडण्यात लोकांची भलती मस्ती दिसत व्हती. इरसालपणा जाणवत व्हता. आता तमाशा इस्कटल की काय अशी भीती वाटायला लागली. इतक्यात गावचा इसा चेअरमन उठला. तडक तमाशात घुसला. बत्ती हिसकावून घेतली. आन इजऊन टाकली. माणसाचा कालवा झाला. कोण कुणाला काय म्हणतय, कोण शिव्या देतय, कोण मारामारी करतय, कोणाचाच कोणाला ताळमेळ लागलं नाही.
तमासगिराणी गोषा गुंडाळला. आणि चावडीत घुसले.
मारामारी सुरूच होती, कोण कोणाला मारतय कोणाचा डोकं फुटल,कोण ओरडतोय कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता. गावातल्या सगळ्या बाया पुढे हुऊन आपापल्या गड्याला सावरीत घरला घेऊन गेल्या. तवा गाव शांत झालं. पुढील पाडव्याच्या सणाची वाट पहात………

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा