You are currently viewing बेस्ट’ च्या उपक्रमासाठी पाठविलेल्या एसटी कामगारांना योग्य त्या सुविधा द्या….

बेस्ट’ च्या उपक्रमासाठी पाठविलेल्या एसटी कामगारांना योग्य त्या सुविधा द्या….

अन्यथा मनसेशी गाठ; बनी नाडकर्णी यांचा इशारा

कुडाळ

‘बेस्ट’ च्या उपक्रमासाठी पाठविलेल्या एसटी कामगारांना योग्य त्या सुविधा आणि सवलती द्या, अन्यथा मनसेशी गाठ आहे, आता त्यांच्या जीवाशी खेळाल तर मनसे स्टाईलनेचं उत्तर देऊ, असा इशारा प्रसिध्दी पत्रकातुन महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार मनसेचे उपाध्यक्ष जे. डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकातून परिवहन विभागाला दिला. व अखंड महाराष्ट्र भरातून बेस्टची सेवा बजावण्यासाठी गेलेल्या त्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल कुत्र्याला नको असे झाले असल्याचे सांगितले.

या प्रसिध्दी पत्रकात नाडकर्णी यांनी म्हटले की, अगोदरच प्रामाणिकपणे अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारात दिवस काढावे लागत आहेत. त्यात तीन महिने विनापगार ते सेवा बजावत आहेत. एवढ सगळ असुनही एसटी प्रशासनान त्यांच्या मरणाची पुरेपुर सोय मुंबईमध्ये करून ठेवलेली. कोविड सेंटर असलेल्या हॉटेलचे रुम, अळी असलेल जेवण अशी थ्री स्टार सेवेची सोय त्यांच्यासाठी करून ठेवली असल्याचा टोला त्यांनी लगावला. या विरोधात कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला असता पर्यायी सोय म्हणून त्यांची जेवणाची सोय गोरेगाव डेपोच्या भंगार ठेवलेल्या जागेत करण्यात आली.

त्यांच्यासाठी कुठलीही आरोग्य सुविधा नाही. त्यातून सिंधुदुर्गातून पाठवलेल्या एसटी बसही सुस्थितीत नाहीत.
हा सगळा प्रकार कानी पडताच महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांच्या आदेशाने स्वतः त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पहाणी करून एसटी प्रशासनान एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या थ्री स्टार सेवेच पितळ उघड पाडल. यापुढे एसटी कामगारांना अशा उपक्रमासाठी पाठविण्यात येत असल्यास त्यांना चांगल्या सुविधा द्या. डेपोतून एकही गाडी बाहेर पडू देणार नाही, असा यावेळी इशारा दिला. बेस्ट च्या सेवेसाठी सुस्थितीत असलेल्याच एसट्या पाठविण्याची ताकिद दिली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची खाण्याची व राहण्याची योग्य त्या ठिकाणी सोय करा, कर्मचाऱ्यांची काळजी घ्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेशी गाठ आहे असे खडे बोल सुनावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 3 =