You are currently viewing राजमाता पार्वतीदेवी यांची जयंती १ मे रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात साजरी होणार

राजमाता पार्वतीदेवी यांची जयंती १ मे रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात साजरी होणार

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दिनांक 1 मे रोजी सकाळी 9 वाजता सावंतवाडी संस्थानच्या भूतपूर्व राजमाता श्रीमंत पार्वतीदेवीसाहेब यांची 116 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन श्री अण्णा केसरकर ऊपस्थित राहाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले , युवराज लखमसावंत भोंसले उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा