You are currently viewing फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा “ड्रीम प्रोजेक्ट” बाबत जारी केलेल्या बांधकाम विभागाच्या पत्राने प्रचंड प्रक्षोभ 

फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा “ड्रीम प्रोजेक्ट” बाबत जारी केलेल्या बांधकाम विभागाच्या पत्राने प्रचंड प्रक्षोभ 

सहमती असताना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने फोंडा बाजारपेठ उध्वस्त!रुंदीकरणाचे काम कुर्मगतीने!

बाधित इमारतींची नुकसान भरपाई द्या–ग्रामस्थांची आर्त हाक !

फोंडाघाट

फोंडाघाट बाजारपेठेतील एसटी स्टँड बाहेरील स्टॉलधारक तसेच नुकसान भरपाई द्या आणि मग रस्ता रुंदीकरण करा यावर ठाम असलेले ग्रामस्थ,-इमारत-मालक- व्यापारी यांना उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून नोटीस वजा पत्र देण्यात आल्यामुळे, बाजारपेठेमध्ये रुंदीकरण विरोधात आणि कामाच्या निकृष्टतेबाबत प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे.याबाबत काल बुथ कमिटी सक्षमीकरण बैठकीस आलेले, स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास, येथील कार्यकर्त्यांनी ही बाब आणून दिल्याचे समजते.

बांधकाम विभागाच्या या पत्रात व्यापारी-घरमालक यांना पथकिनाऱ्याचे उल्लंघन केल्याने, व अतिक्रमण झाल्याने ते तारीख २-०५-२३ पूर्वी, स्वखर्चाने काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तर उपलब्ध रस्त्याचा लँडप्लॅन जो भूमी अभिलेख कडून प्रमाणीत करून घेण्यात आल्याने, त्याची हद्द १४ मीटर दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे हे बांधकाम अतिक्रमण ठरवून ते काढण्याचे कळविण्यात आले आहे. मात्र ही वस्तुस्थिती खोटी असून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत हा रस्ता भूमी अभिलेख कडे वर्ग अथवा नोंद नसल्याचे दस्तूर खुद्द अधिकाऱ्यांनी आमदारांचे समक्ष सांगितले होते. त्यावेळी ५ मीटर प्रमाणे रस्ता रुंदीकरणाला सर्वांनी सहमती दर्शवली होती. बाजारपेठेमध्ये बहुसंख्य घरे सुमारे १०५ वर्षांपूर्वीची एनए असून त्यामध्ये जर अतिक्रमण केले असेल तर ते काढून देण्यास सर्व ग्रामस्थ तयार होते.

रुंदीकरणाबाबत आजवर सक्षम अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ- व्यापाऱ्यांशी साधक बाधक चर्चा केलेली नाही किंवा चर्चेच्या फेऱ्याही झाल्या नाहीत. सहविचार सभा सात मिनिटात आवरताना कोणाचेही बोलणे ही ऐकून घेतले गेले नाही. मा.सार्वगौड साहेबांनी आचार्य विनोबांच्या भूदान चे उदाहरण देऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. आणि रस्ता रा.म. १७८ हा पारंपारिक रस्ता असल्याची दिशाभूल करून रुंदीकरणाला चे आवाहन केले. त्यामुळे जीर्ण झालेली किंवा नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेली घरे-इमारती, पेठेतील घरमालकांनी पाडून रुंदीकरणाच्या गटाराला जमिनी मोकळ्या करून दिल्या. याचाच फायदा ठेकेदारांनी घेतला.आणि आपल्या माणसांशी तडजोड करून सहा मीटर ऐवजी काही ठिकाणी चार मीटर वर तर काही ठिकाणी सात मीटरवर गटारे खोदली आहेत.बांधलेल्या गटारावर अनधिकृत बांधकाम, व्यावसायिक, भाजी- मासे विक्रेते, होकर्स यांचे अतिक्रमण ही झाले आहे. याकडे ना सक्षम अधिकाऱ्याचे लक्ष, ना ग्रामपंचायतीचे ! मग ज्यासाठी हा खेळ मांडला,तो वाहतूक खोळंबा टाळणार कसा ? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे.

ज्या विकास कामासाठी संपूर्ण पेठेतील ग्रामस्थ व्यावसायिकांनी सहमती दर्शवली त्या फोंडाघाटच्या ड्रीम प्रोजेक्ट ला सार्वजनिक बांधकाम खाते, ठेकेदार, ग्रामपंचायत यांच्या नियोजनशून्य-उद्धट आणि हम करे सोssss कामकाजा मुळे, आता बाजारपेठेतील ग्रामस्थ- व्यापारी, झक मारून सहमती दिली असा संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे तारीख दोन रोजी होणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेला, तीव्र विरोध करण्याची ठाम भूमिका विरोधी ग्रामस्थ- व्यापारी- खोकेधारक यांनी घेतली आहे.

मात्र आज पाच मीटर ऐवजी पाच- सहा-सात मीटरने रस्ता रुंदीकरणाचे काम गेले दोन महिने कुर्मगतीने चालू आहे.स्थानिक ठेकेदाराला सहकार्य करा,असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केल्याप्रमाणे बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण हटवताना चिरेबंदी- मातीच्या भिंती पाडून सहकार्य केले. मात्र ठेकेदारांनी मापे घेताना काही ठिकाणी मध्यापासून चार मीटर, पाच मीटर, सात मीटर गटारे खोदून इमारतींना धोका पोहोचवला आहे. यावेळी गेले दोन महिने कामावर कामगार, व्यतिरिक्त बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा विभागीय अभियंता कधीही दिसत नव्हते. रात्री उशिरापर्यंत कामे सुरू असल्याने पेठेतील नागरिकांना त्या ग्रामस्थांना बरोबर घेऊन केल्यास नक्कीच स्पष्ट होऊ शकते. आणि १ कोटी ७७ लाख रुपयांचा “ड्रीम प्रोजेक्ट” यशस्वी होऊ शकतो-

प्रतिक्रिया व्यक्त करा