You are currently viewing आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी स्व जिल्ह्यात आदर्शवत काम करावे – दशरथ शिंगारे

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी स्व जिल्ह्यात आदर्शवत काम करावे – दशरथ शिंगारे

कणकवली

*महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कणकवली च्या वतीने आयोजित आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम तसेच संघटनेच्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मारुती विद्यामंदिर जाणवली , कणकवली येथे नुकताच संपन्न झाला . कणकवलीचे तालुकाध्यक्ष दशरथ शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली शुभेच्छा व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला .प्रसंगी उपस्थित स्मिता सुरेंद्र कोरगावकरशिक्षक भारती सिंधुदुर्ग महिला आघाडी अध्यक्षा , आंतर जिल्हा बदली धारक मदनकुमार नारागुडे , रूपाली जाधव , जिल्हा उपाध्यक्ष मंगेश खांबळकर ‘तालुका सचिव श्रीराम विभुते ,विशाल जाधव आदी उपस्थित होते .संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षिका स्मिता सुरेंद्र कोरगावकर उपशिक्षिका खारेपाटन नंबर – १ तालुका कणकवली यांचा संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमा ,मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षक मदनकुमार नारागुडे ,रूपाली जाधव यांचा सन्मान संघटनेच्या वतीने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल ,श्रीफळ व मानपत्र देऊन करण्यात आला.आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी सिंधुदुर्गातील केलेल्या आदर्शवत कामाचा वारसा आपल्या स्व जिल्ह्यात उठवावा व वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक भारती परिवाराच्या कौटुंबिक सोहळ्यात आपली उपस्थिती असावी अशी इच्छा शिंगारे यांनी व्यक्त केली .तसेच महिला जिल्हाध्यक्ष स्मिता कोरगावकर यांनी आपल्या संघटनेची वाटचाल ही आदर्शवत आहे . आपण सर्व संघटनेचे आयकॉन आहात . त्याचबरोबर विद्यार्थी प्रिय शिक्षक आहात .आपल्या कार्याने आणखी आपले शिक्षण क्षेत्र पवित्र होईल, संपन्न होईल असा आशावाद व्यक्त केला .व संघटनेसाठी रु . १० ,००० / – आर्थिक देणगी दिली .संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दशरथ शिंगारे ,श्रीराम विभुते, संजय कोळी , कल्पना सावंत दीपिका चव्हाण ,मंगेश खांबळकर, रामचंद्र डोईफोडे यांनी विशेष मेहनत घेतली .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव श्रीराम विभूते यांनी केले तर आभार संजय कोळी तालुकामुख्य संघटक यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा