*ज्येष्ठ नागरिक, अपंग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत; महाराष्ट्र दिनापासून अंमलबजावणी – मुख्यमंत्री*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबई मेट्रोमधून आता जेष्ठ नागरिक, अपंग आणि विद्याथ्यांना महाराष्ट्र दिन म्हणजे एक मेपासून प्रवासात २५ टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. ‘मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ वापरणार्या हजारो पण या श्रेणीतील हजारो प्रवाशांनाच ही सुविधा मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि अपंग प्रवाशांना ४५ किंवा ६० फेऱ्यांसाठी मुंबई १ कार्डच्या सहाय्याने पासावर ही सवलत मिळणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि लहान मुलांच्या गरजा व सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मेट्रो जाळे तयार केले आहे. या वर्गाला सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांनासुद्धा एसटी बसमधून ५० टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
*कोणाला आणि कशी मिळणार सवलत ?*
ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी अपंग या वर्गातील नागरिकांसाठी आहे. या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अपंगांना सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.
ही सवलती मेट्रो लाइन २ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई १ कार्डवर देखील सवलत असेल. तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील. ‘मुंबई १ कार्ड’ किरकोळ सामान विक्री दुकाने, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल. हे कार्ड नसणाऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
मेट्रो २ ए (पिवळी लाईन) अंधेरी पश्चिमेतील दहिसर ई आणि डीएन नगरला जोडते, तर मेट्रो ७ अंधेरी ई आणि दहिसर ई (लाल लाईन) दरम्यान धावते. हा उपक्रम सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन देईल, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होईल. ही सवलत सर्व नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-