You are currently viewing रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ १ मे रोजी

रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ १ मे रोजी

वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने या कार्याची सुरुवात सोमवार दि. १ मे रोजी होणार असून प्रारंभी तलाव सफाई व गाळ काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजना अंतर्गत श्री रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरण कार्यासाठी रुपये २ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या भागात रुपये ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून या कार्याची सुरुवात सोमवार दि. १ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे. श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, वेंगुर्ला नगरपरिषद, समस्त वेंगुर्लेकरवासीय व भक्तजन परिवार यांच्या लोकसहभागातून प्रारंभी श्री रामेश्वर तलाव सफाई व गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सर्वांच्या श्रमदानातून व सहभागातून श्री देव रामेश्वराची सेवा घडावी व उर्वरित कार्यात सर्वांचे सहकार्य घेऊन सुशोभिकरण कार्य पूर्णत्वास जावे या करीता तमाम वेंगुर्लेकरवासीयांनी या पवित्र कार्यास हातभार लावावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा