You are currently viewing सातेरी वाचनालयाच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर…

सातेरी वाचनालयाच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर…

वेंगुर्ला

वेतोरे येथील श्री देवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने घेतलेल्या निबंध, रंगभरण व चित्रकला स्पर्धांचा पारितोषिक वितरण व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम श्री साई योगेश्वर मंगल कार्यालयामध्ये डॉ. अभिजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
ग्रंथ हेच गुरु निबंध स्पर्धेत कौस्तुभ चव्हाण, भावना गावडे, सार्थक जामदार, रंगभरण स्पर्धेत रमा गोगटे, हर्ष कांबळी, चैत्यना कुंभार, रिद्धी नाईक तर चित्रकला स्पर्धेत समर्थ मेस्त्री, सिद्धार्थ नाईक, पृथ्वीक राऊळ, दुर्वा वेतोरकर यांनी क्रमांक पटकाविले. बक्षिस वितरण प्रसंगी वरचीवाडी सरपंच प्राची नाईक, भारत माता क्लासेसच्या संचालिका आराध्या गोगटे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी राऊळ, वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे, उपाध्यक्ष डॉ. राधाकृष्ण वेतुरकर, संचालक दीपक नाईक, समिर राऊळ, ग्रंथपाल सिद्धेश राऊळ, प्रसाद राऊळ, धनजंय शिरोडर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा