उबाठा आणि खा. संजय राऊत यांनी त्यांना उत्तर द्यावे
कणकवली
आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या.मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधी ही चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत नाहीत.त्यांचे आरोप किंवा त्यांनी दिलेली माहिती खरीच असते असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रत्येक मुद्द्याचे माध्यमांशी बोलताना समर्थन केले आहे. ते म्हणले,आमदार नितेश राणे यांना आता मुख्य प्रवक्ते केलं आहे, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे आता मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तर देणारच. श्री.नितेश राणे यांनी जी काही माहिती सांगितली असेल ती माहिती खरी असणारच त्याचे उत्तर उबाठा सेनेने आणि खा. संजय राऊत यांनी द्यावे.