You are currently viewing मुंबईच्या समिधा कुबलने पटकावला “सागर सुंदरीचा किताब”

मुंबईच्या समिधा कुबलने पटकावला “सागर सुंदरीचा किताब”

गाबीत महोत्सव निमित्ताने दांडी किनाऱ्यावर सागर सुंदरी स्पर्धेचे आयोजन

 

मालवण :

मालवणातील दांडी किनाऱ्यावर आयोजित गाबीत महोत्सवातील सागर सुंदरी स्पर्धेत मुंबई येथील समिधा (गौरी) कुबल हिने “सागर सुंदरीचा किताब” पटकावीला. तर जामसंडे येथील डॉ. निशा धुरी यांनी द्वितीय आणि मालवण धुरीवाडा येथील लतिका शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेत गाबीत समाजातील १४ तरुणींनी सहभाग घेतला होता. पारंपारिक वेशभूषा, पश्चिमात्य वेशभूषा व कला सादरीकरण, मनपसंत फेरी अशा तीन प्रश्नमंजुषा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या सर्व फेऱ्यांमध्ये वरचढ ठरत समिधा उर्फ गौरी कुबल हिने “सागर सुंदरीचा किताब” पटकाविला. तर डॉ. निशा धुरी हिने द्वितीय व लतिका शिर्सेकर हिने तृतीय क्रमांक मिळावीला.

तर विजेत्या समिधा हिला क्राऊन व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक तर द्वितीय व तृतीय क्रमांकास क्राऊन व रोख रक्कम देऊन अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत बेस्ट स्माईल – सोनिया कोचरेकर (वेंगुर्ला), बेस्ट पर्सनॅलिटी – दीपशिखा रेवंडकर (दांडी मालवण), बेस्ट फोटोजेनिक फेस – हर्षदा कांदळगावकर (देवगड), बेस्ट कॉश्युम – प्राची जोशी (मालवण) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेची पारितोषिके सौ. अन्वेषा आचरेकर, सेजल परब, दीपिका घारे, नारायण धुरी, वैभव खोबरेकर यांनी पुरस्कृत केली होती. परीक्षण लक्ष्मीकांत खोबरेकर व सौ. मनस्वी कुबल यांनी केले. स्पर्धेसाठी चेतन हडकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, पूजा सरकारे, सेजल परब, अन्वय प्रभू, सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, संमेष परब, रुपेश खोबरेकर, नारायण धुरी, वैभव खोबरेकर, रुपेश खोबरेकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू, स्नेहल परब आदी व इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा