You are currently viewing आंगणेवाडीचे सुपुत्र सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती

आंगणेवाडीचे सुपुत्र सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती

मसुरे :

 

आंगणेवाडीचे सुपुत्र नारायण उर्फ सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती जाहीर झाली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड जाहीर करण्यात आली आहे. सर्वांसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सुधा आंगणे यांची ओळख आहे.

आंगणेवाडीतील विविध धार्मिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांचे मार्गदर्शन लाभते. सुधा आंगणे यांच्या निवडी बद्दल आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, मधुकर आंगणे, छोटू आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे, शशी आंगणे, सुनील आंगणे, नंदू आंगणे, बाबू आंगणे, बाळा आंगणे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा