You are currently viewing जिल्हा क्रिकेट संघात एस.आर.आय अकॅडमीच्या मुलांची निवड

जिल्हा क्रिकेट संघात एस.आर.आय अकॅडमीच्या मुलांची निवड

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 15 वर्षाखालील मुली व 14 वर्षाखालील मुले जिल्हा क्रिकेट संघासाठी निवड चाचणी मध्ये इन्सुली येथील एस आर आय ॲकॅडमी ऑफ क्रिकेट च्या पाच मुलांची निवड झाली आहे. त्यामध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या संघात कुमारी जा नह वी बोकाडे दिव्य ज्योत या स्कूलमध्ये शिकत आहे तर रोहिणी चव्हाण बांदा प्राथमिक शाळा इयत्ता सहावी तर मुलांच्या 14 वर्षाखाली संघात आरपीडी हायस्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी अभिषेक भरत गरुडकर वेदांत मळी क मिलाग्रीस हायस्कूल तर आर्यन नाटेकर संजय घोडावत हायस्कूल अशा एकूण पाच जणांची जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे . प्रशिक्षक भरत गरुडकर व व्यवस्थापक रमेश बोकाडे राधा बोकाडे राकेश बोकाडे पुष्पा बोकाडे यांचे सहकार्य लाभले यांनी मुलांना ग्रामीण भागात लेदर बॉल क्रिकेट साठी मैदान उपलब्ध करून दिले तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वरूप नाटेकर यांनीही या अकॅडमी साठी व मुलांसाठी सर्वतोपरीचे सहकार्य केले आहे . इन्सुल्ली ग्रामीण भागातील या शाळकरी मुलांची जिल्हा क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =