*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री रेखा कुलकर्णी लिखित अप्रतिम ललितलेख*
*पाऊस मनातला*
ये रे घना ये रे घना,
न्हावू घाल माझ्या मना.
माझ्या मनाचे हे आवडते गाणे मन नेहमीच गुणगुणते ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे त्याने भान हरावे’ असे म्हणण्यापेक्षा ‘वर्षा ऋतूचे पहा सोहळे त्याने भान हारावे’ असाच विचार करते माझे मन ….
माझी सदोदित सोबत करणारा, वेळी अवेळी मला हवा तसा बरसणारा,
तरसवणारा तर कधी विरहदाह सोसायला लावणारा, कधी मिलणाची उत्सुकता रोमारोमात भरून आलेला, कधीअवखळ, कधी नि:शब्द, कधी डोळ्यांतून नकळत ओघळणारा, कधी लपंडाव खेळणारा, कधी बेभान, कधी बेफाम, कधी संहारक, कधी सृजनशील कधी रेशीम लडी प्रमाणे, कधी अल्लडपणे तुषार उधळत तो माझ्या मनात वसतो. नाना रूपांची चित्र गॅलरी आहे माझ्या मनातला पाऊस ….!
माणूस जो जो मोठा होत जातो तो तो त्याला पाऊस जवळचा वाटायला लागतो .आपला हक्काचा त्याच्याशी मनमोकळा संवाद साधता येतो. असा मित्रच असतो मनातला पाऊस…..
बालपणीचा मनातला पाऊस प्रत्यक्ष उपभोगलेला… मनसोक्त भिजणे, पाण्यात नावा सोडणे. शाळेत साठलेल्या पाण्यात तासनतास खेळत बसणे… अजूनही हा अवखळ पाऊस बरसत असतो माझ्या मनात… बालपणीचा तो काळ सुखाचा पुन्हा एकदा दाखवतो मला…
पावसाच्या धारा
येती झरझरा
झाकोळले नभ
सोसाट्याचा वारा
पाठ्यपुस्तकातली ही कविता किती आवडायची माझ्या मनाला
थोडी मोठी झाले आणि पावसाने बंधने घातली मला द्वाड मेला ! स्वतः मुक्त बसायचा पण मला मात्र भिजण्याची मनाई तेव्हा आईची आळवणी करायचे
ए आई मला पावसात जाऊदे ना….
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊदे….
आज काय झालय मनाला. आज हा स्वस्त बसू देत नाही आठवण देत राहतो त्या गंधाळलेल्या क्षणाची, ओल्या स्पर्शाची,अंगावरून निथळणाऱ्या थेंबा थेंबाची…..! कुठे गेले ते मंतरलेले दिवस आणि पावसाळा …..
अजूनही बरसतो तेव्हाचा पाऊस मनात. पावसाळी सहलीला तर उधाण यायचे. धबधब्यात जाऊन थांबणे, ओलेत्याने डोंगर चढणे, वाफाळलेल्या शेंगा आणि भाजलेले कणीस….मन तर तेव्हाच जाऊन पोचले सहलीच्या ठिकाणी ! ‘तो ‘ पण येईल फक्त भेटीची आशा मनाला पण….. पाऊस असा कोसळला की हातात धरलेला हात ‘लवकर चल जोरात येतोय’ म्हणून कधी कमरेभोवती यायचा समजायचं नाही…..
फुलपाखराचे रंग लेवून दिवस भरकन उडून गेले ……
पण पाऊस मनात अजूनही रेंगाळत आहे तो आता प्रौढ, विचारी झाला आहे कधी सुखाच्या सरीने न्हाऊ घालतो तर कधी दुःखाच्या माऱ्यात झोडपून काढतो. आम्हा बायकांच्या डोळ्यात आणि मनात ही तो कायमस्वरूपी वास्तव्यास असतो. भावनेच्या ढगांची गर्दी झाली आणि ओठ बंद ठेवायची वेळ आली की मनातला पाऊस डोळ्यातून आपोआपच पोचतो गालावर…..असे डोळ्याचे भरलेले आभाळ घेऊन मी कितीदा तरी आभाळाकडे पाहत असते आणि तो मला म्हणत असतो थांब आत्ताच नको बरसू देऊस तुझं आभाळ. मी येतोय. तुझी दुःख दूर करायला. तुला भेटायला…..
कधीकधी शंका-कुशंकांचे ढग समस्यांचा काळाभोर रंग घेऊन मनात गर्दी करतात. असे वाटते आता हा बरसला तर सारे उध्वस्त करून जाईल. बाहेरच्या पावसाने किती हानी झाली मोजता येते पण मनात अशी ढगफुटी झाली तर होणारी हानी….. कल्पनाच न केलेली बरी….
अंधारल्या दिशा दाही
कुट्ट आभाळ दाटले
असा बरसला वैरी
माझे प्राक्तन फाटले
असेही म्हणायची वेळ आली कधी कधी…..
काही असो हा मनातला पाऊस प्रियकर जास्त आहे माझा. त्याचा आवेग, मिलनोत्सुक स्पर्श, तनामनाला तृप्त तृप्त करणारी त्याची रिमझिम भावते मनाला. त्यांने मनाच्या मातीत रुजवलेले बीज जेव्हा अंकुरते तेव्हा सृजनोत्सव होतो. माझे मातृत्व फुलते. मी दातृत्व पेलते. मुक्तहस्ताने देऊन रिते होण्यातला आनंद आणि तृप्ती त्याच्यासोबतच माझ्या चेहऱ्यावरही स्थिरावते……
मन पाऊस पाऊस,
बीज रुजवी उदरी.
तुझ्या माझ्या मिलनाची,
सदा आस माझ्या उरी
सदा आस माझ्याउरी…….
रेखा कुलकर्णी ©®
*संवाद मीडिया*
*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*
*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*
*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*
*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*
*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*
*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*
*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*
*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*
*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*
*जाहिरात लिंक*
———————————————-