You are currently viewing राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयवंतराव पाटील रविवारी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांची साधणार संवाद….

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयवंतराव पाटील रविवारी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांची साधणार संवाद….

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी ११ वाजल्यापासून ओरोस येथील शरद कृषी भवन येथे नामदार पाटील पक्षातील पदाधीकारी व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्येक तालुकानिहाय संघटनात्मक आढावा घेणार आहेत. तरी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाला मानणाऱ्या सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्ह्याच्या वतीने खारेपाटण येथे जंगी स्वागत होईल. त्यानंतर कणकवली आणि ओरोस येथे स्वागत होईल. ओरोस येथील शरद कृषी भवन येथे उपस्थित झाल्यानंतर नामदार जयंत पाटील जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक चर्चा करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांशीही जयंत पाटील चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्रश्न समजून घेणे यावर भर असणार असून संघटनात्मक चर्चाही होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 6 =