पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशने मानले आभार
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीने जिल्हा क्रीडा संकुलातील सहा बॅडमिंटन कोर्टची निर्मिती
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे सहा बॅडमिंटन कोर्टांची निर्मिती पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.
याबाबत असोसिएशनने १५ जुलै २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र पाठवून कृतज्ञता व्यक्त केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पालकमंत्र्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे, सकारात्मक सहकार्यामुळे आणि क्रीडा विकासासाठी असलेल्या बांधिलकीमुळे जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध झाली आहे.
या सुविधेमुळे खेळाडूंना नियमित सराव, प्रशिक्षण तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी अधिक सक्षमपणे तयारी करण्याची संधी मिळणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल असोसिएशनने मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, भविष्यातही असेच मार्गदर्शन व सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
