You are currently viewing गुजरातला पळविलेले चांगले प्रकल्प कोकणात आणा –  डॉ.जयेंद्र परुळेकर 

गुजरातला पळविलेले चांगले प्रकल्प कोकणात आणा – डॉ.जयेंद्र परुळेकर 

सावंतवाडी

रोजगाराचे खोटे गाजर दाखवून जगातला सर्वात मोठा पेट्रोल केमिकल हा प्रदूषणकारी प्रकल्प कोकणावर लादून चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत गुजरातचे हे प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू अशी भूमिका आज ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी मांडली.

तर नाणार बारसू येथे प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही थांबविण्यात यावी, तेथील ग्रामस्थ महिलांना केंद्र व राज्य सरकार नक्षलवादी व दहशतवादी प्रमाणे देत असलेली वागणूक इंग्रज राजवटीलाही लाजवेल अशी असल्याचे श्री परुळेकर यांनी सांगितले.

श्री परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेत बारसू येथे पेट्रोल केमिकल प्रकल्पाच्या निमित्ताने तेथील ग्रामस्थ व महिलांवर होणाऱ्या दडपशाही बाबत केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, बारसू येथे होणारा पेट्रोल केमिकल प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे मात्र सरकारकडून ग्रीन रिफायनरी म्हणून हा प्रकल्प पुढे करत आहेत. या ठिकाणी प्रदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे तब्बल प्रतिवर्षी 9 कोटी मेट्रिक टन इतका कच्च्या तेलाचा साठा याठिकाणी येणार आहे मात्र यातून निर्माण होणारे प्रदूषण हे कोकणासह गोव्याला ही हानिकारक ठरणार आहे. आज रोजगाराच्या नावाखाली हा प्रकल्प येथे लागण्याचा प्रयत्न होत आहे.मुळात ऑटोमेशनच्या जमान्यात येथे केवळ शिपाई सेक्युरिटी गार्ड याच नोकऱ्या शिल्लक राहणार आहेत त्यामुळे रोजगाराचे खोटे गाजर दाखवू नका.

श्री परुळेकर पुढे म्हणाले, कोकणात प्रकल्प आणायला आमचा अजिबात विरोध नाही या ठिकाणी आलेला वेदांता फाॅक्सकाॅन’ टाटा एअरबाॅक्स प्रकल्प कुठे गेला याचे उत्तर सरकारने द्यावे. आज चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत हे प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू कोकणी माणसांना विकासाचा प्रकल्प पाहिजे विषारी वायू नको. कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी जनतेला विश्वासात घ्या त्यांना प्रकल्पाचे फायदे तोटे समजावून नंतरच प्रकल्प लादा कारण या देशाला आंदोलनातूनच स्वतंत्र मिळाले आहे हे सरकारने लक्षात ठेवावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा