You are currently viewing मविआलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे; १ मे नंतर वज्रमूठ सभाच होणार बंद

मविआलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे; १ मे नंतर वज्रमूठ सभाच होणार बंद

आमदार नितेश राणे यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांना सुनावले

कणकवली

महाविकास आघाडीलाच उद्धव ठाकरे यांचे ओझे झालेले आहे. त्यामुळेच १ मे मविआ ची शेवटची सभा होणार आहे.त्यानंतर वज्रमूठ सभा होणारच नाही. उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोण कोणाचे ओझे झाले आहे हे शोधण्यापेक्षा यापुढे महाविकास आघाडीचे कसे होणार यावर बोलावे. राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पात उद्धव ठाकरे यांच्याशी निगडित, त्यांच्या जावळच्या कोणी कोणी जमिनी घेतल्या हे सांगण्याची वेळ आणल्यास सातबारा सकट यादी जाहीर करू असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला.
ओम गणेश निवासस्थानी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते,आमदार नितेश राणे म्हणाले,स्वतःला पवारांचा माणूस म्हणून घेणारे उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत हे बारसु प्रकरणी पवार साहेबांच्या भूमिकेला विरोध करतात. आमच्या राहुल कुल यांनी इशारा देतातच संजय राऊत यांनी इतर साखर कारखान्यांवरील चौकशीचा मुद्दा घेतलेला आहे. याचा अर्थ पवारांच्या साखर कारखान्यांची चौकशी संजय राऊत यांना हवी आहे. यातूनच हे राऊत ना उद्धव ठाकरेंचे ना पवारांचे हे स्पष्ट झालेले आहे. हे राजकारणातील लावारिस आहेत काय ? असा सवाल सुद्धा आमदार नितेश राणे यांनी केला.
आमदार श्री.राणे म्हणाले बारसू येथील रिफायनरी साठी जमिनी कोणाच्या आहेत याची जंत्री खोलात जाऊन खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांना काढायची असेल तर त्यांनी जरूर काढावी. यापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी काही नावांची यादी जाहीर केलेली आहे.यात ठाकरेंच्या नावाची आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या कशा जमिनी आहेत हे त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे राऊत यांना आपल्या मालकाला आणखीन अडचण जाण्याचे असेल तर निश्चितच त्या याद्या जाहीर कराव्यात. मग आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निगडित असणाऱ्या लोकांच्या जमिनींचे सातबारा दाखवू. असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
स्वतःला कडवट शिवसैनिक म्हणणारे खासदार संजय राऊत जय स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मोठमोठे विधाने करतात त्यांना शिवसेनेचा स्थापना दिवस माहित नाही. त्यांना बाळासाहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली हे संजय राऊत यांना माहीत नाही यातूनच ते डुब्लिकेट शिवसैनिक आहेत. चायनीज मॉडेल आहेत हे दिसून येत. शिवसेना पक्ष हा आणि त्याचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे.त्यामुळे शिवसेना पक्ष दुसरा कोणत्याही नेत्यांनी आपला म्हणणे म्हणजेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अपमान करणे आहे.ठाकरे किंवा संजय राऊत यांना शिवसेना बोलायचेच असेल तर त्यांनी उबाठा सेना असे बोलावे. अन्यथा तो निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपमान होईल. या संदर्भात आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा