You are currently viewing जय मल्हार मित्र मंडळातर्फे १ मे रोजी  धनगरवाडा येथे विविध कार्यक्रम

जय मल्हार मित्र मंडळातर्फे १ मे रोजी  धनगरवाडा येथे विविध कार्यक्रम

वैभववाडी

जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, आरोग्य शिबीर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, शालेय साहित्य वाटप, व सैन्यदल भरती अग्निशमन जवानांना सत्कार सोमवार दिनांक 1 मे 2023 सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर उद्घाटक नावळे सरपंच सोनल गुरव, मंडळाचे अध्यक्ष संजय गुरखे कार्याध्यक्ष चंदु गुरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाला मोठे संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा