You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साहसोहळा साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साहसोहळा साजरा

सावंतवाडी

२९ ऑगस्ट २०२२ , सोमवार या आजच्या दिवशी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साह सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला गेला. श्रीगणरायांच्या आगमनाकरिता शाळेचे संचालक आदरणीय श्री. रुजूल पाटणकर व सौ. काश्मीरा पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामात, सर्व उपस्थित शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व मदतनीस या सर्वांनीच मिळून मोठ्या उत्साहात श्रीगजाननाचे वाजत गाजत स्वागत केले. इ. ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी लेझिमनृत्य करून श्रीगणेशांचे स्वागत केले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. ‌श्रीगणेशाच्या आगमनानंतर सर्वांनी मिळून श्रीगणेशाला भक्तीभावाने वंदन केले. श्रीगणेशाला फळांचा व मोदकांच्या नैवैद्य तसेच श्रीगणेशाला आवडणाऱ्या दुर्वा व लाल जास्वंदीची फुले वाहण्यात आली. त्याचप्रमाणे सर्वांनी मोठ्या उत्साहाने श्रीगणेशाची आरती केली. इ. ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी गणपतीवर आधारित समूहात भक्तीगीत गायान केले. व शाळेतील सर्व शिक्षकांनीही मिळून समूहात भक्तीगीत गायन केले. शिक्षकेतर कर्मचारी व मदतनीस यांनी मिळून मोठ्या आनंदाने फुगड्या देखील घातल्या. तसेच सर्वांनी मिळून मोठ्या जल्लोषात गणपतीबाप्पांचा जयजयकार केला. सर्वजण गणपतीबाप्पांच्या भक्तीमध्ये रंगून गेले. अशाप्रकारे मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव हा सण साजरा केला गेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − sixteen =