You are currently viewing सावंतवाडीत माजी राज्यमंत्र्यांच्या अंगणात आढळला तीन फुट कोब्रा…

सावंतवाडीत माजी राज्यमंत्र्यांच्या अंगणात आढळला तीन फुट कोब्रा…

सावंतवाडी

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या अंगणात आलेल्या तब्बल तीन फुटी कोब्रा जातीच्या सापाला पकडण्यात यश आले. सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांनी त्याला जेरबंद करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कोब्रा जातीचा साप श्री. भोसले यांच्या घरासमोर रस्त्यावर फिरताना काही नागरिकांना आढळून आला. दरम्यान काही वेळानंतर तो घाबरून श्री. भोसले यांच्या अंगणात उतरला. त्यानंतर याबाबतची माहिती सर्पमित्र वेंगुर्लेकर यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यां सक्षम त्या सापाला जेरबंद केले. व नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा