सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थीना जाहीर आवाहन करण्यात येते की, ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50% सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31.03.2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत. मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. सिंधुदूर्ग यांचेमार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील इतर मागास ( ओबीसी ) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे.