You are currently viewing ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे व कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट तर्फे  वेताळ बांबर्डे येथे व्यक्तिमत्व विकास शिबीर

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे व कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट तर्फे  वेताळ बांबर्डे येथे व्यक्तिमत्व विकास शिबीर

कुडाळ

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे व कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी ९:३० ते १२:३० या कालावधीत मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, प्रा. अनुराग पाणिग्रही हे करियर मार्गदर्शन आणि डॉ. साईनाथ सीतावर हे व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमाला आवळेगाव हायस्कुलचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश घडी सर आणि शिवाजी इंग्लिश स्कुलचे सर्जेराव झेंडे सर, दीपक हेब्बाळकर सर, प्रसाद सामंत सर यांची प्रमख उपस्थिती लाभणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =