You are currently viewing कणकवली गडनदीपुलावर नगरपंचायतीच्यावतीने स्वागत कमान

कणकवली गडनदीपुलावर नगरपंचायतीच्यावतीने स्वागत कमान

जानवली पुलावरही लवकरच स्वागत कमान –  नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

‘स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली’ अशी स्वागत कमान कणकवली नगरपंचायतीच्यावतीने गडनदीपुलावर उभारण्यात आली आहे. लवकरच जानवली पुलावरही अशी कमान उभारली जाणार असल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.

राज्यात विविध उपक्रमांतर्गत व कर वसुलीमध्ये कणकवली नगरपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याखेरीज कणकवली नगरपंचायतीच्यावतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्‍याअनुषंगाने शहराच्या वेशीवरील गड आणि जानवली पुलावर एलईडी दिवे असलेली स्वागत कमान उभारली जात असल्‍याचे श्री.नलावडे म्‍हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा