You are currently viewing वाफोली येथील ५ मे रोजी श्री देवी माऊली पंचायतन वर्धापन दिन

वाफोली येथील ५ मे रोजी श्री देवी माऊली पंचायतन वर्धापन दिन

बांदा :

 

श्री देवी माऊली पंचायतन वर्धापन दिन निमित्ताने वाफोली येथे सत्यनारायणाची पूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन दिनांक ५ मे रोजी योजनेत आले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी आठ वाजता श्री गणेश पूजा, प्रयचीत विधी, देवतांना नारळ विडे, पुण्याहवाचन , प्रधान देवता स्थापन पूजन, श्री सूक्त जपाभिषेक, देवता होम हवन,कुमारिका पूजन, बलिदान, पूर्णाहुती, सत्यनारायण महापूजा, तसेच ठीक दुपारी २ वाजता महानेवैद्य, महाआरती,देवता प्रार्थना प्रार्थना, आशीर्वाद ,तीर्थप्रसाद महाप्रसाद, तसेच ६ वाजता ग्रामस्थांची भजने व ठीक रात्री १० वाजता हेळेकर दशवतार नाट्यमंडळ यांचा कालचक्र हा नाट्यप्रयोग होणार आहे.

भव्य दिव्य कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी माऊली स्थानिक सल्लागार उपसमिती वफोली चे अध्यक्ष विलास गवस तसेच वाफोली गावचे प्रमुख मानकरी, वाफोली हितवरधक ग्रामस्थ संस्था, मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा