अस्मिता कोकाटे व राखी शिर्सेकर यांचे कौतुकास्पद यश
तळेरे : प्रतिनिधी
मुलींना संधी मिळाली तर त्या नक्कीच त्याच सोनं करून दाखवतात पुरूषांच्या खांद्याला खांद्या लावून आज अनेक महिला यशोशिखरावर यशस्वी झालेल्या आहेत. त्यात सध्या पोलीस भरतीकडे अनेक मुलींचा कल दिसतो.यामुळेच मनात जिद्द, कष्ट करण्याची तयारी व अभ्यासूवृत्ती अंगी असल्यास कोणतीही गोष्ट आपण सहज मिळवू शकतो. हेच हेरून आपण पोलिस होणार ? असा निश्चय केलेल्या कणकवली तालुक्यातील कासार्डे गावातील कु.अस्मिता अरविंद कोकाटे व कु.राखी दिपक शिर्सेकर या दोन युवतींनी खडतर परिश्रम घेत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीत त्याची निवड झाली आहे. यातील कु. अस्मिता ही सिंधुदुर्ग तर कु. राखी ही वसई विरार मध्ये सेवा बजावणार आहे. त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
मुलगी म्हणजे पराक्याचे धन, वंशाला दिवा हवा. वृद्ध काळात काठी हवी, अशी समाजामध्ये मानसिकता असते. परुंतु याच समाजापुढे प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर कासार्डेतील दोन युवतींनी समाजात एक आदर्श ठेवला आहे.आज या दोन्ही मुलींनी पोलीस भरतीत मैदानी असो वा लेखी परीक्षेत यश मिळवत थेट महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्या आहेत. यातील कासार्डे जांभूळवाडी येथिल कु. राखी हिचे आई वडील शेती व्यवसाय करत शेतकरी कुटुंबातील मुलीने पोलिस होण्याची इच्छा बाळगल्या नथंर आपल्या मुलीने पोलिसात भरती व्हावी यासाठी तीला कुटुंबातून नेहमीच पाठबळ मिळाले. राखीनेही त्यानी मिळालेल्या पाठबळाच्या जारोवर अथक मेहनत करीत आपले कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यालनतंर सिंधुदुर्ग व वसई विरार सारख्या भागात राहून पोलीस भरतीचे धडे घेऊन सतत सराव करीत आजचे यश संपादन केले आहे.
तर कासार्डे नकाशेवाडीतील कु. अस्मिता ही आईच्या पोटात असतानाच वडीलांचे देहासन झाले होते. याचवेळी वडीलाचे छत्र हरपल्यानंतर तीच्या आईने या, प्रतिकूल परिस्थितीत जात कु. अस्मिता व भाऊ ओमकार याचा सांभाळ करीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. कु. अस्मिताची घरची परिस्थिती सामान्य असून देखील त्यावर मात करत तीने पोलीस भरती चा अडथळा तिने पार केला. ती कबड्डी सारख्या खेळातही जिल्हा पातळीवर चांगली कामगिरी करत शाळेचे व संघाचे नाव उज्ज्वला केले.आजवरच्या यशात माझ्या आईची मला नेहमीच साथ असल्याने आजचे यश पहावयास मिळाले असे तीने आवर्जून सांगितले.
या दोन्ही सामान्य कुटुंबाती कुटुंबातील रणरागिणींचे कौतूक सर्वांकडून होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. दोघांच्याही पालकांनी आम्ही मुलगा मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. या उलट त्यांनी स्वतः च्या पायावर उभा राहावं. हीच इच्छा होती. आणि त्यांनी साकारली. त्या दिवा नसल्यातरी आमच्या वंशाच्या पणती आहेत. असे म्हणत आजचे यश त्याच्या मेहनतीचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले.यातील कु.राखी शिर्सेकर हीची मिरा भाईंदर वसई विरार व कु.अस्मिता कोकाटे हीची सिंधुदुर्ग पोलीस दलात निवड झाली असून त्यांना आई वडील,कुटुंबिय व सिंधुदुर्ग येथील अकॅडमी,विजयी भव: अकॅडमी, नालासोपारा याचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
1 कु. अस्मिता कोकाटे
2 कु. राखी शिर्सेकर