You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात प्रत्येक बुथवर नागरिकांसोबत पाहीला जाणार

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात प्रत्येक बुथवर नागरिकांसोबत पाहीला जाणार

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम वेंगुर्लेत ९३ ही बुथ वर पहाण्यासाठी नियोजनाची बैठक जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली .
ह्यावेळेस ३० एप्रिल चा ” मन कि बात ” हा कार्यक्रम १०० वा असल्यामुळे जास्तित जास्त नागरिकांनी पहावा यासाठी भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी नियोजन करावे , व प्रत्येक बुथवर किमान १०० लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पहाण्याचे नियोजन करण्यात येऊन कार्यक्रमाचे स्थळ व कार्यक्रम प्रमुख नेमण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि ” मन कि बात ” ने आपल्या अनोखेपणामुळे सरकार आणि देशवासीय यांच्यातील राजकारणाबाह्य मुद्द्याबाबत चर्चा करणारे व्यासपीठ तयार केले आहे . या कार्यक्रमाने तरुण , शेतकरी वर्गाला योग , मानसिक आरोग्य या मुद्द्यांशी जोडले आहे . तसेच शेतकरी आणि उद्योजकांना प्रेरणा देण्याबरोबरच ते त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणारे व्यासपीठ देखील बनले आहे. श्रोत्यांशी भावनिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आणि निर्णायक नेतृत्व हे पंतप्रधान मोदींच्या ” मन कि बात ” या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे.
यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सुषमा खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता. उपाध्यक्ष प्रीतेश राऊळ , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , ता.चिटणीस समिर कुडाळकर , परबवाडा सरपंच शमिका बांदेकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , तुळस माजी सरपंच विजय रेडकर , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , वेतोरे शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर गावडे , अणसुर शक्तीकेंद्र प्रमुख गणेश गावडे , मठ शक्तीकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर , वायंगणी शक्तीकेंद्र प्रमुख शामसुंदर मुननकर , मातोंड शक्तीकेंद्र प्रमुख ताता मेस्त्री , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , सागरतीर्थ बुथ प्रमुख बाळु वस्त , तुळस बुथ प्रमुख संदिप कुमार बेहरे , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा