कोरोना मुक्त तालुक्यात वैभववाडीत आज नवीन पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना मुक्त तालुक्यात वैभववाडीत आज नवीन पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एकुण रुग्ण संख्या 143, सक्रिय रुग्ण पाच.

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात शुक्रवारी नवीन पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 143 इतकी झाली आहे. गेले आठ दिवस वैभववाडी तालुका कोरोना मुक्त होता. परंतु शुक्रवारी खांबाळे येथे चार तर सांगूळवाडी येथे एक रुग्ण आढळून आला आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे यांनी दिली आहे. सक्रिय रुग्ण संख्या तालुक्यात पाच झाली आहे. पाचही रुग्ण होम आयसुलेशन मध्ये ठेवण्यात आले आहेत.

कोरोना मुक्त तालुका घोषित झाल्यापासून अनेक जण बीनधास्त झाले आहेत. शहरात गर्दी वाढली आहे. मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी लोक फिरताना दिसत आहेत. हे फार धोकादायक आहे. अशा वागण्यामुळे रुग्ण संख्या वाढू शकते त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन केले पाहिजे असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
कोणीही आजाराकडे दुर्लक्ष करू नये, प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. नवनाथ कांबळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा