*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” माझी गौराई*”
तू इथेच तर असतेस,
देव्हाऱ्यातली अन्नपूर्णा
चैत्र शुद्ध तृतीयेला
करतो तूझी स्थापना.
तू माहेरवाशीण बनते
आनंदाने झोपाळ्यावर सजते
माहेरवाशिणी च्या कोडकौतुकात
. सारे घरच दंगते.
पन्ह, हरभरे, कैरीडाळीचा नैवेद्य
सुंदर ,ताज्या फुलांची आरास
छान चौरंगावर बैसुनी
तू नटली बनुनी खास.
ओटी हरभऱ्याची भरून सवाष्णी
आशीर्वाद मागतात या माहेरवाशिणी
कधी हत्तीवर, कधी पाळण्यात
गौर माझी दरवर्षी सजते
न जाणो माहेरी जाऊन
मन परत भुतकाळात रमते..
एक महिना असाच संपतो
हळदीकुंकाने निरोपाचा क्षण येतो
तू असतेस जवळच देव्हाऱ्यात खरं तरं
पण तूला पाठवताना अश्रू दाटतात आभाळभर…
अशी ही माझी माहेरवाशिणी चैत्रगौर
अशी ही माझी माहेरवाशिण चैत्रगौर..
सौ योगिनी देशपांडे – पैठणकर नाशिक.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-